भास्कर जाधव एकटे असल्यावर वेगळे बोलतात, आदित्य ठाकरे असल्यावर वेगळ्या टोनमध्ये बोलतात!

मंत्री नितेश राणेंची टोलेबाजी; मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी लवकरच बैठक घेणार


नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली. मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भास्कर जाधव यांना उत्तर देताना राणे म्हणाले, “भास्कर जाधव एकटे असताना वेगळ्या टोनमध्ये बोलतात, आदित्य ठाकरे असताना वेगळ्या टोनमध्ये बोलतात. आदित्य ठाकरे नसताना तर मिठीही मारतात,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.


आमदार भास्कर जाधव यांनी मत्स्यविकास बोर्डाच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, “१ जून ते १ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी असते, तेव्हा मच्छिमारांना उत्पन्नाचे साधन नसते. मासळीचे दर वाढले तरी बहुतांश पैसा दलालांकडे जातो, मच्छिमार उपेक्षित राहतात. म्हणूनच माथाडी बोर्डाच्या धर्तीवर मत्स्यविकास बोर्ड स्थापन केले होते. पण आज या बोर्डाची मुंबईत स्वतःची जागाही नाही. मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी यात लक्ष घालून मत्स्यविकास बोर्डाचे पुनरुज्जीवन करावे,” अशी सूचना जाधव यांनी केली.


यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. “भास्कर जाधव यांनी खूप चांगली माहिती दिली. मी नक्कीच या बोर्डाची माहिती घेईन. त्यांनी केलेली सूचना अतिशय महत्त्वाची आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ,” असे आश्वासन राणे यांनी दिले. तसेच, “जाधव यांचा अनुभव मच्छिमार आणि कोकणाला उपयोगी पडला तर आम्हाला आनंदच आहे,” असेही ते म्हणाले.


सिल्वर पापलेट माशांबाबत निवेदन

दरम्यान, सिल्वर पापलेट माशाच्या संख्येबाबत समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारने ५ सप्टेंबर २०२३ रोजी सिल्वर पापलेटला ‘राज्य माशा’चा दर्जा दिला आहे. तसेच ५४ मासळी प्रजातींवर मासेमारी बंदी घातली आहे. “पापलेटची संख्या कमी होत असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत. या प्रजातीच्या संरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलली आहेत,” असे त्यांनी सभागृहात निवेदन करताना सांगितले.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा