मोहित सोमण: चांदीत आज गगनचुंबी वाढ झाली आहे. युएसमध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण समितीच्या (FOMC) धोरणानुसार २५ बेसिस पूर्णांकाने कपात जाहीर केली. त्यामुळे डॉलर व ट्रेझरी यिल्डमध्ये घसरण होत चांदीत आणखी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात तिसऱ्यांदा प्राईज करेक्शन होत असून चांदीने २ लाख प्रति किलोचा आकडाही पार केला आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज २ रूपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात २००० रूपयांनी वाढ झाल्याने चांदी सर्वोच्च पातळीवर (All time High) वर पोहोचली आहे. गेले काही दिवसांत सोन्याच्या किंमती काही प्रमाणात स्थिरावत असल्या तरी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगत सोन्याऐवजी चांदीत गुंतवणूक वाढवल्याने चांदी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. एकूणच गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या प्रचंड मागणी व अपुरा पुरवठा यामुळे प्रत्यक्ष चांदी व ईटीएफ गुंतवणूकीत (Exchange Traded Fund ETF) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आज मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २० रूपयांनी वाढत २०१० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर प्रति किलो सरासरी दर २००० रूपयांनी वाढत २०१००० रूपयांवर पोहोचले आहेत. उपलब्ध माहितीनुसार,गेल्या तीन दिवसात चांदीच्या दरात १२००० रूपयांनी वाढले आहेत. जागतिक स्तरावर चांदीचा सिल्वर फ्युचर निर्देशांकात २.३१% वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी प्रति डॉलर ६२.४० औंसवर पोहोचली आहे. तर मार्च महिन्यासाठीच्या चांदीच्या वायदा करारांनी (Futures) ६१.४३ डॉलर प्रति औंसचा उच्चांक गाठला आहे.
या संपूर्ण वर्षभरात आतापर्यंत चांदीच्या भावात १००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आगामी महिन्यांत पुरवठा कमी होण्याची आणखी अपेक्षा असल्याने चांदीने सोन्याला आता मागे टाकले आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीत मोठ्या प्रमाणात महत्व सुरु झाल्याने चांदीतील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पर्याय व वाढणारी ईव्ही व इतर उद्योगातील वाढलेली मागणी त्यामानाने कमी असलेला चांदीचा पुरवठा या सर्व कारणांमुळे चांदीत आणखी वाढ होण्याची वाढ अपेक्षित आहे.






