बंगलोर: मायक्रोसॉफ्टने आपल्या ऐतिहासिक १७.५ अब्ज डॉलर गुंतवणूक भारतात एआय व क्लाऊड तंत्रज्ञान सुविधा विकसित करण्यासाठी जाहीर केल्यानंतर आता मायक्रोसॉफ्टकडून कॉग्निझंट, इन्फोसिस, टाटा, विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपन्यांशी हातमिळवणी करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता मायक्रोसॉफ्ट भारतात आपल्या कंपनीचे प्रत्येकी ५०००० एजेंटिक एआय लायसन्स संबंधित कंपन्याना देणार असून एकूण २ लाखांहून अधिक लायसन्स कंपनी भारतात लागू करणार आहे.
या माध्यमातून कंपनी मायक्रोसॉफ्ट ३६५ कोपायलट तैनात करतील यातील भागीदारी व सहकार्यामुळे उद्योगांमध्ये एआय आधारे चालणारे विविध उपक्रम चालवताना उत्पादकता, कार्यक्षमता आणि सुलभता वाढवता येणार आहे असे कंपनीने आपल्या म्हटले आहे. तांत्रिकदृष्ट्या कोर ऑपरेशन्समध्ये एआयचा समावेश करून या संस्था फ्रंटियर फर्म्स बनत आहेत केवळ एआय स्वीकारत नाहीत तर डिलिव्हरी, विक्री, वित्त, एचआर आणि ग्राहक सहभाग यासारख्या कार्यांमध्ये ही तंत्रज्ञान प्रणाली सामील होते. ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी एआय असल्याने, या कंपन्या उत्पादकता, नवोपक्रम आणि एंटरप्राइझ परिवर्तनासाठी नवीन बेंचमार्क स्थापित करत आहेत असेही कंपनीने करार घोषित करताना म्हटले आहे.
भागीदारीतील महत्वाचे मुद्दे -
एंटरप्राइझ-स्केल जनरेटिव्ह एआय, लाखो लोकांसाठी व्यवसाय ऑपरेशन्स आणि कर्मचाऱ्यांच्या अनुभवांमध्ये परिवर्तन आणणार
जगातील सर्वात मोठ्या कोपायलट पैकी एक असलेल्या, इन्फोसिस एआयला दैनंदिन कार्यप्रवाहात मदत त्यामुळे ज्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि क्लायंट डिलिव्हरी वाढते.
गिटहब कोपायलट टीममध्ये कोडिंगचे लोकशाहीकरण करत आहे, जलद विकास आणि नावीन्यपूर्णता सक्षम करत आहे, टीसीएस २८१०००+ सहभागींचा समावेश असलेल्या जागतिक हॅकाथॉनचे आयोजन करत आहे.
विप्रोने मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि गिटहब तंत्रज्ञानात २५०००+ कर्मचाऱ्यांना अपस्किल केले.