गोव्यातील नाईट क्लब आग प्रकरण ;अखेर लुथरा ब्रदर्सना अटक

गोव्यातील बिर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता.ज्या रात्री ही घटना घडली,त्याच रात्री या क्लबचे मालक गौरव आणि सौरभ लुथरा देश सोडून थायलंडला पळून गेले.या दोघांना आता तिथे ताब्यात घेण्यात आलं आहे. याआधी गोवा पोलिसांनी नाईट क्लबच्या पाच कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकांना अटक केली आहे.


आग प्रकरणाचा तपास सुरू असताना गोवा पोलिसांना दिसून आलं की सात डिसेंबर रोजी मध्यरात्री १.१७ वाजता ‘मेक माय ट्रिप’ या अॅपवरून थायलंडला जाणाऱ्या विमानाची तिकिटं बुक करण्यात आली होती.त्यावेळी आपत्कालीन पथकं क्लबमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होती. एकीकडे अग्निशमन दल आग विझवण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे लुथरा बंधू देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते.तर लुथरा बंधू फरार नव्हते, ते बिझनेस ट्रिपला गेले होते,अशी बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली होती. दिल्लीच्या एका न्यायालयाने लुथरा बंधूंना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला.लुथरा ब्रदर्सच्या वकिलांनी कोर्टात असाही दावा केला की ते दोघं फक्त क्लबचे परवानाधारक होते. क्लबचं दैनंदिन कामकाज कर्मचारी हाताळत होते.


क्लबला सहा डिसेंबर रोजी मध्यरात्री आग लागली होती आणि अवघ्या काही क्षणांतच त्या आगीने संपूर्ण क्लबला वेढलं होतं. याप्रकरणी आठ दिवसांत चौकशी अहवाल तयार होईल. राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती. तसंच सर्व मनोरंजन स्थळांवर सुरक्षेची तपासणी कडक केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Comments
Add Comment

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसीय माघी गणेशोत्स..

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज आपल्याला प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. आज माघी

फार्मा कंपनी डॉ रेड्डीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर शेअर इंट्राडे ६% उसळला

मोहित सोमण: डॉ रेड्डीज लॅब्स लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती...माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणपती जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म झाला आहे.

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

शेअर बाजाराची जोरदार वापसी सेन्सेक्स ८५० व निफ्टी २६१ अंकांनी उसळला

मोहित सोमण: गेले काही दिवसांत सातत्याने बाजारात घसरण झाली होती. आज मात्र पुन्हा वापसी करत शेअर बाजारात तुफान वाढ

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी