युएस आयटी कंपनी विकत घेतल्यानंतरही टीसीएस शेअर १% पातळीवर कोसळला

मोहित सोमण: टीसीएसने युएसमधील मध्यम आकाराची आयटी कंपनी कोस्टल क्लाऊड लिमिटेड कंपनीचे ७०० दशलक्ष डॉलर्सला अधिग्रहण केले आहे. तरीही कंपनीच्या शेअर्समध्ये १% पर्यंत घसरण झाली आहे. सकाळपासून कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी व मंदी या दोन स्तरात स्थित्यंतर होत असताना एक्सचेंज फायलिंगमध्ये अधिग्रहणाविषयी स्पष्ट केल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर १२.१५ वाजता ०.५६% घसरत ३१८७.४० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सुरूवातीच्या कलात शेअर्समध्ये ०.१० ते ०.२०% पातळीवर वाढ झाली होती मात्र अस्थिरतेच्या कारणांमुळे कंपनीच्या शेअरला चांगल्या बातमीनंतरही घसरण पहावी लागत आहे. झालेल्या डीलमधील माहितीनुसार, टीसीएसने अस्तित्वात असलेल्या व थकलेल्या देयकासह ७०० दशलक्ष डॉलर्सला या कोस्टल क्लाऊड कंपनीचे अधिग्रहण केले आहे.


उपलब्ध माहितीनुसार, टीसीएस कंपनीच्या युएसमधील उपकंपनी लिस्ट एंगेज मिडको (ListEngage MidCo) कंपनीच्या मार्फत हा करार केला गेला आहे. कंपनीने याबद्दलची माहिती एक्सचेंजला कळवली असून अंतिम मोहोर नियामकांकडून मिळणार आहे. उपलब्ध रिपोर्टनुसार कोस्टल क्लाऊड कंपनीने १३२ दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवला असून सप्टेंबर २०२५ पर्यंत १४१ दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, टीसीएस २००४ साली सूचीबद्ध झाली तेव्हापासून घेतलेल्या मोठ्या निर्णयापैकी एक निर्णय म्हणून ओळखला जातो. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात टीसीएसने सध्याची उपकंपनी लिस्ट एंगेज मिडको कंपनी ७२.८ दशलक्ष डॉलर्सला खरेदी केली होती.


२०१२ मध्ये स्थापन झालेली आणि फ्लोरिडा युएस मधील कंपनी कोस्टल क्लाउड ही जागतिक स्तरावरील मोठ्या 'प्युअर-प्ले' सेल्सफोर्स भागीदारांपैकी एक समजली जाते. ही कंपनी ४०० हून अधिक ग्राहकांना सेवा देते.क्लाउड, सेल्स क्लाउड, मार्केटिंग क्लाउड, रेव्हेन्यू आणि सीपीक्यू क्लाउड आणि कॉमर्स क्लाउडसह सेल्सफोर्स इकोसिस्टममधील सल्ला, अंमलबजावणी आणि व्यवस्थापित सेवांमध्ये या आयटी संबंधित उत्पादनात कंपनी विशेषज्ञ आहे. टीसीएस शेअर गेल्या ५ दिवसात १.७३% घसरला असला तरी महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ४.५९% वाढ झाली आहे. वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २२.५१% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत