'प्रहार' शेअर बाजार: आयटी, बँक, मिडकॅप शेअरने केला 'गेम' बाजी पलटल्याने सावधगिरीचे संकेत सेन्सेक्स २७५.०१ व निफ्टी ८१.६५ अंकांने घसरला 'या' कारणांमुळे

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आज २७५.०१ अंकाने घसरत ८४३८१.२७ व निफ्टी ८१.६५ अंकांनी घसरत २५७५८.०० पातळीवर स्थिरावला आहे. खऱ्या अर्थाने शेअर बाजारातील 'गेम' बँक निर्देशांकासह मिडकॅप शेअर्सने फिरवला. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत ०.३६% घसरण झाल्याने निर्देशांकाचे पारडे पालटले आहे. सुरूवातीच्या सत्रातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीच्या आशावादावर उत्साही असलेले वातावरण अखेरीस नकारात्मकतेत बदलले आहे. थोड्याच वेळात युएस फेड रिझर्व्ह व्याजदरावर कपातीवरील निर्णय जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने शेअरमधील खरेदी आज मोठ्या प्रमाणात थांबली असून रूपयात पुन्हा एकदा घसरण झाल्याने प्रति डॉलर ९० पेक्षाही कमी पातळीवर रुपया व्यवहार करत होता. अखेर कंसोलिडेशन होत असताना विकली एक्सपायरीसह फेड निर्णयाचा फटका बाजारात दिसत आहे. विशेषतः अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) जैसे थे राहिला असताना कंज्यूमर ड्युरेबल्स (१.६८%), फायनांशियल सर्विसेस २५/५० (०.५४%), आयटी (०.९६%) शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचाही फटका बाजारात बसल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आज रुपयांच्या आधारे मोठे सेल ऑफ केले आहे. दुसरीकडे मेटल (०.४१%), मिडिया (०.२७%), फार्मा (०.१२%) वाढ कायम राहिली आहे.


निफ्टी व्यापक निर्देशांकात मिडकॅप सिलेक्ट (१.५५%), मिडकॅप १०० (०.३२%), मिडकॅप २०० (०.४८%), मिडकॅप ५० (१.१७%) निर्देशांकात घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर सुरूवातीच्या कलात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०५%), नासडाक (०.०९%) बाजारात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.११%) घसरण कायम राहिली. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात गिफ्ट निफ्टी (०.३१%), निकेयी (०.३६%), स्ट्रेट टाईम्स (०.०३%), कोसपी (०.२१%) यासह बहुतांश बाजारात घसरण झाली असून जकार्ता कंपोझिट (०.५१%),व हेंगसेंग (०.२०%) तैवान वेटेड (०.७१%) बाजारात वाढ झाली आहे.


अखेरच्या सत्रात हेवीवेट ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपैकी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अँक्सिस बँक, स्विगी, डिक्सन टेक्नॉलॉजी, इन्फोसिस यांसारख्या शेअर्समध्ये घसरण झाली असून वाढ रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी एएमसी, वेंदाता, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बजाज हाउसिंग सारख्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.


आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बलरामपूर चिनी (७.५४%), वेलस्पून लिविंग (६.८०%), हिन्दुस्तान झिंक (४.२९%), नवीन फ्ल्यूटो (४.२६%), बिकाजी फूडस (४.१८%), आयसीआयसीआय प्रोडूंनशियल लाईफ इन्शुरन्स (३.०९%), ज्योती सीएनसी ऑटो (२.५२%),एचडीएफसी एएमसी (१.९७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण कायनेस टेक (१०.१७%), डिक्सन टेक्नॉलॉजी (८.६३%), लेटंट व्ह्यू (५.४३%), ईरीस लाईफसायन्स (५.४३%), बीएसई (४.९३%), रिलायन्स पॉवर (४.६०%), आयटीसी हॉटेल्स (३.७०%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'जपानी बाँड उत्पन्नात वाढ आणि बीओजेच्या आर्थिक कडकपणाच्या संकेतांमुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये सतत अस्थिरता दिसून आली, ज्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये जोखीम कमी होण्याची भावना निर्माण होत आहे. आता लक्ष आगामी यूएस फेड बैठकीकडे वळले आहे, जिथे २५-बीपीएस दर कपात मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. तथापि, अंतर्गत विभागणी आणि मिश्र आर्थिक निर्देशक २०२६ मध्ये पुढील दर कपातीच्या अपेक्षा कमी करू शकतात. भारतीय बाजारपेठांमध्ये जागतिक सावधगिरीचे प्रतिबिंब दिसून आले, सततच्या एफआयआय बहिर्गमन, भारतीय रुपयातील कमकुवतपणा आणि चालू चर्चा असूनही अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींभोवती अनिश्चितता यामुळे ते ओझे झाले. नजीकच्या काळात, बाजाराची दिशा मध्यवर्ती बँकेच्या संकेतांवर आणि व्यापार विकासावरील स्पष्टतेवर परिणाम करेल.'

Comments
Add Comment

आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट

तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

'ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात गिरगाव बीचवरही दिसू शकेल'

मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम