युपीआय पेमेंट जगात नंबर १! IMF कडून जाहीर

प्रतिनिधी: युपीआय ही जगातील नंबर १ इकोसिस्टीम बनली आहे. तसा निष्कर्ष जगातील विख्यात वित्त संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund IMF) संस्थेने आपल्या अहवालात दिले आहेत. जून २०२५ मध्ये प्रकाशित केलेल्या 'ग्रोइंग रिटेल डिजिटल पेमेंट्स (द व्हॅल्यू ऑफ इंटरऑपरेबिलिटी)' या अहवालात केलेल्या व्यवहाराच्या आधारे इतर डिजिटल पेमेंट तुलनेत युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही जगातील सर्वात मोठी रिटेल फास्ट पेमेंट सिस्टम (FPS) म्हणून ओळखली जाऊ लागली आहे असा निष्कर्ष संस्थेने नोंदवला आहे. वित्त मंत्रालयाच्या मतेही, 'प्राइम टाइम फॉर रिअल-टाइम' २०२४ वरील एसीआय (ACI Worldwide Report) अहवालानुसार, जागतिक रिअल-टाइम पेमेंट सिस्टम व्यवहाराच्या प्रमाणात एकट्या युपीआयचा वाटा सुमारे ४९ % वाटा आहे.


नवीन आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये युपीआयचे व्यवहार नोव्हेंबर २०२४ च्या तुलनेत सुमारे २३% वाढले असून व्यवहार मूल्य जवळजवळ १४% वाढले आहे. गेल्या नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत, ही वाढ आणखी वाढली आहे.फक्त दोन वर्षांत युपीआय व्यवहारांमध्ये व्हॉल्यूममध्ये जवळजवळ ७०% आणि मूल्यांकनात ४१% अधिक वाढ झाली आहे.


यापूर्वी युपीआयसारख्या डिजिटल पेमेंट सिस्टमचा अवलंब घरोघरी पोहोचवण्यासाठी व लघु व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने अनेक महत्वाचे उपक्रम प्रथम प्राधान्य क्रमांकावर घेत या डिजिटल पेमेंट प्रणालीला बळ दिले त्याचाच परिणाम म्हणून सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी वेळोवेळी विविध उपक्रम हाती घेतल्याने देशातील बहुतांश नागरिकांनी युपीआय व्यवहार आत्मसात केले आहेत.


सरकारकडूनही कमी किमतीच्या BHIM-UPI व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन योजना आणि पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) याची तरतूद सरकारने यापूर्वीच केली होती. जिथे वित्तीय बाजारात तितकीशी पोहोच नाही अथवा तंत्रज्ञानाचा वापर नाही अशा क्षेत्रात तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी टियर-३ ते ६ केंद्रांमध्ये डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर सरकारने विकसित केले.


दरम्यान, यूपीआयने नोव्हेंबर २०२५ व्यवहारात वाढ सुरू ठेवल्याने २८ नोव्हेंबरपर्यंत २४.५८ लाख कोटी रुपयांचे १९ अब्ज व्यवहार युपीआयने ओलांडले आहेत असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नुकतेच स्पष्ट केले आहे.


मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीनुसार,३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत, पीआयडीएफद्वारे टियर ३ ते ६ केंद्रांमध्ये अंदाजे ५.४५ कोटी डिजिटल टच पॉइंट्स तैनात करण्यात आले आहेत तसेच आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत, अंदाजे ६.५ कोटी व्यापाऱ्यांना एकूण ५६.८६ कोटी क्यूआर तैनात करण्यात आले आहेत.सरकार, आरबीआय आणि एनपीसीआयने (National Payments Corporation of India NPCI) ज्यांनी युपीआय व्यवहारांना प्रारंभ केला त्यांनी देशभरात सार्वजनिक सेवा, वाहतूक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह व्यवसायांमध्ये रुपे आणि यूपीआय द्वारे डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले होते.


गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे, जेव्हा नोव्हेंबर २०२४ मध्ये युपीआयने २१.५५ लाख कोटी रुपयांचे १५.४८ अब्ज व्यवहार नोंदवले होते. इयर ऑन इयर बेसिसवर युपीआय व्यवहारात स्थिर वाढ होत आहे हे हेच अधोरेखित करते की डिजिटल पेमेंट्स भारताच्या दैनंदिन जीवनात कसे खोलवर रुजले आहेत.


एनपीसीआय डेटा देखील गेल्या पाच वर्षांत सातत्याने युपीआय व्यवहार वाढ झालेली दाखवत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये युपीआयने ७.६८ लाख कोटी रुपयांचे फक्त ४.१८ अब्ज व्यवहार नोंदवले असून नोव्हेंबर २०२२ पर्यंत, हे आकडे जवळजवळ दुप्पट झाले आहेत.

Comments
Add Comment

Tata Hospital Bomb Threat : परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; रुग्णालय परिसर रिकामा

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल मुंबई : मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल

Crude Oil Price: युएसचा व्हेनेझुएलावर कब्जा तरी कच्च्या तेलात घसरण का? 'ही' आहे थोडक्यात इनसाईड स्टोरी!

मोहित सोमण: कच्च्या तेलाच्या निर्देशांकात पहाटे प्रचंड अस्थिरता निर्माण झाल्याने कच्च्या तेलाच्या (Crude Oil)

AAP Sarpanch Shot in Amritsar : अमृतसरमध्ये थरार! लग्नमंडपात घुसून 'आप' नेत्याची डोक्यात गोळी झाडून हत्या; अवघ्या १३ सेकंदात आरोपी पसार

चंदीगड : पंजाबमध्ये गुन्हेगारांचे मनोबल किती वाढले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली

आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Bandhan Bank Share after Quarter Results: दमदार तिमाही निकालानंतर बंधन बँकेच्या शेअर्समध्ये थेट ४% उसळी

मोहित सोमण: बंधक बँकेने समाधानकारक कामगिरी नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४% वाढ सुरुवातीच्या सत्रात झाली

CSB Bank Share: तिमाही निकालानंतर सीएसबी बँकेचा शेअर ५% उसळत अप्पर सर्किटवर पोहोचला

मोहित सोमण:सीएसबी (Catholic Syrian Bank Limited) बँकेच्या शेअर्समध्ये आज जवळपास ५% वाढ झाली आहे. त्यामुळे आज तिमाही निकालांच्या