Corona Remedies IPO Day 3: कोरोना रेमिडीज आयपीओत आक्रमक गुंतवणूक उदंड प्रतिसादासह अखेरच्या दिवशी ९४.१७ पटीने सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: कोरोना रेमिडीज (Corona Remedies Limited IPO) आयपीओची आज सांगता झाली आहे. ६५५.३७ कोटींचा आयपीओ ८ ते १० डिसेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला झाला होता. संपूर्ण ऑफर फॉर सेल प्रवर्गात मोडत असलेल्या आयपीओला अखेरच्या दिवसापर्यंत एकूण ९४.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण तीन दिवसात आयपीओला उदंड प्रतिसाद मिळाला असल्याने एकूण आयपीओतील सबस्क्रिप्शनपैकी २४.४४ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, १४३.८८ पटीने सबस्क्रिप्शन पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, व १९५.८४ पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाले आहे. कंपनीने आयपीओसाठी १००८ ते १०६२ रूपये प्राईज बँड निश्चित केला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४८६८ रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. कंपनीने आयपीओआधीच १९४.८६ कोटी रुपयांची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली होती.


प्री आयपीओ कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ६४९५.२० कोटी रुपये असून उद्या आयपीओसाठी पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) करण्यात येणार आहे. तसेच शेअर १५ डिसेंबरला बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. एकूण आयपीओत ६१७११०२ शेअर गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध केले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति शेअर ५४ रूपये सवलतही देण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते.


आर्थिक बाजू पाहता इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या महसूलात १८% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात ६५% वाढ झाली आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या मार्च तिमाहीतील १२०२.३५ कोटी तुलनेत जून तिमाहीत उत्पन्नात ३४८.५५ कोटींवर घसरण झाली आहे. तर करोत्तर नफ्यातही तिमाही बेसिसवर १४९.४३ कोटीवरून ४६.२० कोटींवर घसरण झाली. कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाई) २४५.९१ कोटींवरून ७१.८० कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीच्या शेवटच्या जीएमपीनुसार ३०.६०% प्रिमियम दरासह शेअर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मूळ प्राईज बँड व जीएमपी धरून १३८७ रूपये शेअरसह कंपनी सूचीबद्ध होईल असे तज्ञांचे मत आहे.


ऑगस्ट २००४ मध्ये स्थापन झालेली कोरोना रेमेडीज लिमिटेड ही कंपनी महिला आरोग्यसेवा, हृदयरोग, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि इतर उपचारात्मक क्षेत्रांमध्ये उत्पादने विकसित करणारी, उत्पादन करणारी आणि विपणन (Marketing) करणारी एक औषध कंपनी आहे.३० जून २०२५ पर्यंत, कंपनीच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये महिला आरोग्यसेवा, हृदयरोग-मधुमेह, वेदना व्यवस्थापन, मूत्रविज्ञान आणि मल्टीस्पेशालिटी फार्मास्युटिकल्स (जीवनसत्त्वे/खनिजे/पोषण, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वसनासह) अशा उपचारात्मक क्षेत्रांमध्ये ७१ ब्रँड समाविष्ट आहेत.

Comments
Add Comment

वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

Silver Rate Today: चांदी २ लाख प्रति किलो जवळ पोहोचली युएस फेड निर्णयापूर्वी एक दिवसात चांदीत ९००० रूपयांनी विक्रमी वाढ

मोहित सोमण: फेडरल रिझर्व्ह आज व्याजदरात कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात असताना चांदीच्या गुंतवणूक लक्षणीय वाढ

वार्नर ब्रदर्स- नेटफ्लिक्सचा ७२ अब्ज डॉलर करार टांगणीवर? खरेदीच्या युद्धात पॅरामाऊंट पिक्चर्सकडून ७९ अब्ज डॉलरची बोली

न्यूयॉर्क: युएसमध्ये वार्नर ब्रदर्स (Warner Bros) व नेटफ्लिक्स (Netflix) यांच्यातील होणाऱ्या संभाव्य ७२ अब्ज डॉलर्स डीलमुळे

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास