ए आय तंत्रज्ञानाच्या शिखरावर अमेझॉन 'स्वार' भारतात पुढील ५ वर्षासाठी ३५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणार

मुंबई: एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता Artificial Intelligence AI) तंत्रज्ञानाचा सगळीकडेच हल्लाबोल सुरू असल्याने सिलिकॉन व्हॅलीमधील आयटी, व संबंधित इकोसिस्टीम कंपन्यांनी आपले लक्ष भारतासारख्या विकसनशील देशांकडे केंद्रित केले आहे. याच धोरणात्मक पावला अंतर्गत जगातील सर्वात मोठी युएसस्थित कंपनी अमेझॉनने पुढील ५ वर्षात टप्याटप्याने ३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात करण्याची घोषणा केली आहे. भारतातील आपली ए आय तंत्रज्ञानाच्या मूलभूत व पायाभूत सुविधा (Infrastructure) मजबूत करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट केले. १० मिनिटांत डिलिव्हरी या मॉडेलला आणखी भक्कम करण्यासाठी कंपनीने ए आय सह लॉजिस्टिक्स विभागात देखील भक्कम व्यूहरचना आखण्यासाठी हे पाऊल उचलले.


खरं तर इतर इ कॉमर्स क्षेत्रातील रिटेल कंपन्या नफ्यासाठी झगडत असताना आपल्या मार्जिन वाढीकडे लक्ष केंद्रित करत आहेत. या कंपन्यांनाही आपले भांडवल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना अमेझॉनची ही मोठी खेळी समजली जात आहे. इटर्नलची मालकी असलेले ब्लिंकीट, नेक्सस वेचर्सचे झेपटो,टाटा डिजिटलचे बिग बास्केट व फ्लिपकार्टचे मिनीटस यांना स्पर्धेत आव्हान देण्यासाठी ही गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. स्विगी, झेपटो देखील आपली रचनात्मक ताकद वाढवण्यासाठी भांडवल गोळा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज मायक्रोसॉफ्ट कंपनीने ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात इकोसिस्टीम उभारण्यासाठी १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.


असे असताना, 'आम्ही भारतातील लहान व्यवसायांसाठी भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत' असे अमेझॉनचे उदयोन्मुख बाजारपेठ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे.


मागील आर्थिक वर्षात, अमेझॉनच्या भारतातील युनिट्सनी तोटा कमी करण्यासाठी खर्चात वाढ केली होती. मार्केटप्लेस एंटिटी असलेल्या अमेझॉन सेलर सर्व्हिसेस, लॉजिस्टिक्स शाखा अमेझॉन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, अमेझॉन होलसेल आणि फिनटेक युनिट अमेझॉन पे  यांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये त्यांच्या तोट्यात लक्षणीय घट झाल्याचे नोंदवली. अमेझॉनने यासाठी आपल्या जाहीरात खर्चात कपात केली होती.


यापूर्वी मे २०२३ मध्ये, अमेझॉनने सांगितले होते की ते आर्थिक वर्ष २०३० पर्यंत तेलंगणा आणि महाराष्ट्रातील देशातील स्थानिक क्लाउड आणि एआय पायाभूत सुविधांमध्ये भारतात १२.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. गेल्या आठवड्यात अमेझॉनने सांगितले की ते कंपनी गुंतवणूक करण्याच्या मार्गावर आहे आणि ते त्यामुळे १५ दशलक्षाहून अधिक लहान व्यवसायांना एआयचे फायदे भारतीय बाजारात आणतील.'


अ‍ॅमेझॉनची एआय आणि स्थानिक क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवणूक केली होती. तसेच गुगलने याआधी सांगितले होते की देशात पहिले एआय हब स्थापन करण्यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात १५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. विशाखापट्टणम स्थित, हे हब जागतिक स्तरावर गुगलच्या सर्वात मोठ्या हबपैकी एक असेल.

Comments
Add Comment

PSU Bank Mergers: पुन्हा एकदा सरकारी बँकेचे विलीनीकरण चर्चेत,संसदेत पंकज चौधरी यांचे नवे विधान!

मोहित सोमण: पुन्हा एकदा पीएययु बँकेच्या विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी

आज अखेर स्विगीकडून १०००० कोटीची क्यूआयपी ऑफर बाजारात सुरू, कंपनीचा शेअर ३% इंट्राडे उच्चांकावर

मोहित सोमण:अखेर स्विगीकडून आपल्या गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी १०००० कोटीची क्यूआयपी (Qualified Institutional Placement QIP) बाजारात खुली

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक

युपीआय पेमेंट जगात नंबर १! IMF कडून जाहीर

प्रतिनिधी: युपीआय ही जगातील नंबर १ इकोसिस्टीम बनली आहे. तसा निष्कर्ष जगातील विख्यात वित्त संस्था आंतरराष्ट्रीय

Vidya Wires Share Listing: विद्या वायर्स आयपीओला चांगले सबस्क्रिप्शन मिळूनसुद्धा घोर निराशा प्राईज बँडवर शेअर सूचीबद्ध

मोहित सोमण: विद्या वायर्स (Vidya Wires Limited IPO) कंपनी आज बाजारात सूचीबद्ध (Listed) झाली आहे. मात्र आयपीओला सूचीबद्ध होताना

मिशोचे गुंतवणूक मालामाल! शेअर बाजारात दमदार पदार्पण थेट प्रति शेअर ४६.४% प्रिमियम दरासह बाजारात सूचीबद्ध

मोहित सोमण: मिशोचे (Meesho Limited IPO) आज शेअर बाजारात दमदार पदार्पण झाले आहे. मिशोचा शेअर बाजारात ४६.४% प्रति शेअर प्रिमियमसह