गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. अग्निकांडाची घटना घडल्यानंतर पाच तासांनी सौरभ आणि गौरव यांनी मुंबईहून इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत गाठल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. हे दोघेही परदेशात नेमके कुठे गेले? या प्रकरणाचा तपास सुरु असून अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत घेण्याची योजना आखली आहे.


बर्च बाय रोमियो लेन क्लबला रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात जास्त प्रमाणात क्लबचे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेतील आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे दिल्लीला असल्याने एफआयआर दाखल होताच पोलिसांचे एक पथक तातडीने दिल्लीला पोहोचले. दोघांशी संबंधित सर्व ठिकाणांवर पोलिसांकडून धाडी घालण्यात आल्या. पण दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर त्यांच्या घरांवर कायदेशीर नोटिसा चिकटवण्यात आल्या.


गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ डिसेंबरच्या संध्याकाळी दोघांविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले. यानंतर मुंबई इमिग्रेशनशी संपर्क साधण्यात आला. दोन्ही आरोपी ७ डिसेंबर रोजी पहाटे साडे पाच वाजता इंडिगोच्या फ्लाईट 6E 1073 ने फुकेटसाठी रवाना झाले होते. गोवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी संपर्क साधलेला आहे. दोघांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी दिल्लीहून भारत कोहलीला ताब्यात घेतले आहे. त्याला पुढील चौकशीसाठी गोव्याला आणण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची