अनिल अंबानीच काय, त्यांच्या पुत्र जय अंबानीवरही २२८ कोटी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी हे सध्या अनेक आर्थिक घोटाळा चौकशीत मुख्य आरोपी सीबीआयने बनवले असताना आणखी एक धक्का अंबानी कुटुंबियांना मिळाला आहे. अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अनिल अंबानी यांच्यावर २२८ कोटींच्या युनियन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ठपका नियामकांनी ठेवला आहे. त्यामुळे आता अंबानी यांचे पुत्रही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जय अंबानी यांच्या नावाचाही उल्लेख २२८ कोटींच्या कर्ज प्रकरणात युनियन बँकेकडून उल्लेख केला गेला होता. त्या आधारे सीबीआयनेही जय अंबानी यांच्या नावाने गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयने यापूर्वी आंध्र बँकेनंतर आता युनियन बँकेने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला. जय अंबानी यांच्याशिवाय रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, रविंद्र सुधाकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.


युनियन बँकेच्या मुंबई शाखेकडून अनिल अंबानी यांच्या रिलायन्सने ४५० कोटींचे कर्ज घेतले होते. या क्रेडिट मर्यादे (Credit Limit) अंतर्गत पारदर्शक व्यवहार, वेळेवर हप्ते भरणे, सगळ्या पेपरची उपलब्धता, व्याज भरण्याची आश्वासकता व इतर अटीशर्तीवर हे कर्ज कंपनीला प्रदान केले गेले. मात्र काही काळानंतर कंपनीने ईएमआय भरणे बंद केल्याचा अथवा प्रलंबित ठेवल्याचा आरोप बँकेने केला आहे. या प्रकरणी बँकेला २२८ कोटीचे नुकसान झाले असा दावा सीबीआयकडे युनियन बँकेने केला. त्यामुळे बँकेने सप्टेंबर २०१९ पासून कंपनीचे कर्ज खते बँकेने एनपीए (Non Performing Assets NPA) म्हणून घोषित केले.


१ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१९ या कालावधीत कंपनीच्या खात्याची व ताळेबंदीची (Books of Accounts) छाननी फोरेन्सिक ऑडिट मार्फत करण्यात आली आहे ज्यामध्ये सीबीआयला निधीचा गैरवापर करून दुसऱ्या ठिकाणी निधी वळवण्याचा प्रकार घडला आहे असे सीबीआयने प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले होते. यामध्ये बँकेनेही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहातील अनिल अंबानी, त्यांचे पुत्र जय व इतर काही कंपनीच्या निवडक अधिकारी वर्गावर गंभीर आरोप यावेळी केले होते.

Comments
Add Comment

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी मुंबई :

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

१० फेब्रुवारी १२वी, २० फेब्रुवारी ला १०वीची परीक्षा

सुभाष म्हात्रे, अलिबाग : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी रायगड जिल्हा

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा

मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने