नागपूर: महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला भाजप आणि शिवसेनेतील फुटीबाबत जे चित्र निर्माण झाले होते, ते आता लवकरच बदलणार आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात काल (८ डिसेंबर) रात्री उशिराने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ज्यात महायुतीतील मुख्य नेत्यांसह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक असल्याचे समजते.
या बैठकीत महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्या, पक्षप्रवेश, अंतर्गत धुसफूस या वादांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. जवळजवळ दीड तासाच्या चर्चेनंतर, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका महायुती म्हणून संयुक्तपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, पक्षप्रवेश करून घेताना महायुती आणि मित्र पक्ष दुखावले जाणार नाही, याचा प्रत्येकाने विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता महायुतीमधील वाद आता थांबणार असल्याचा अंदाज आहे.
गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा देश सोडून पळून गेल्याची घटना समोर ...
याप्रमाणेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनापासून ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढचे दोन महिने निवडणुका आहेत, काळजी घ्यावी लागेल, रोज अधिवेशनात हजेरी लावा, शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या आहेत.






