अमरावती: राज्यात सध्या राजकारण सोडून दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो बिबट्या! कारण २९ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे संकट वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबटे व मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाला ५६० कोटींचा निधी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले असून पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात १८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांनी मानवी वस्त्यांमध्ये शिरण्यास सुरुवात केल्याने नागरिक आणि शासन अस्वस्थ झाले आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्लांचा मुद्दा लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये वरिष्ठ वनाधिकारी, सचिव, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वित्त सचिव, महाव्यवस्थापक विद्युत वितरण यांच्या समवेत बैठक घेतली होती.
बार्शी: बार्शी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने एक हाती बाजी मारली आहे. त्यामुळे ...
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे. या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लाची बिबट्याने शिकार केली. तर अनेक शेतकऱ्यांना परिसरामध्ये बिबट दिसल्याने प्रचंड भीतीच वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाकडून याभागात सर्च ऑपरेशन राबवून जिथे जिथे बिबट्याचे ठसे आढळून आले तिथे पिंजरा लावण्यात आला आहे.
गेल्या ८ दिवसांपासून शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांना सभोवताल बिबट दिसल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर फक्त कोळवण भागात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे शिरजगावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतातील कामे ठप्प झाली आहेत. रब्बीची पिक पेरणी, कापसाचा वेचा आणि पिकांचे ओलीत थांबले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भागामध्ये ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात आहे, मात्र अद्याप बिबट्या ड्रोन कॅमेरात अथवा वन विभागाला सापडला नाही.






