मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे जेतेपद भारतीय संघाने पटकावले. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने हे जेतेपद पटकावले. यानंतर विश्रांतीवर असलेला भारतीय संघ श्रीलंका दौरा खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय महिला संघ यंदाच्या वर्षात अखेरची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असणार आहे. तर महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीनंतर शफाली वर्माला टी-२० संघात संधी मिळाली आहे. तर राधा यादवला टी-२० संघात संधी मिळालेली नाही. तर गोलंदाजत श्रीचरणीला संधी देण्यात आली आहे.
महिला विश्वचषकानंतर स्मृती मानधनाचे लग्न हा सर्वात चर्चेचा विषय ठरला होता. पण लग्नाच्या दिवशीच स्मृतीचे लग्न स्थगित करण्यात आले. त्यानंतर श्रीलंका मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या दोन दिवसआधीच स्मृती मानधनाने सिने संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न मोडलं असल्याची घोषणा तिने केली. यानंतर आता पहिल्यांदाच स्मृती मानधना मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. स्मृती मानधना या संघाची उपकर्णधार असेल.
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), श्रीचरणी, वैष्णवी शर्मा
भारत-श्रीलंका मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
२१ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, पहिला टी-२० सामना, विशाखापट्ट्णम
२३ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, दुसरा टी-२० सामना, विशाखापट्ट्णम
२६ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, तिसरा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम
२८ डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, चौथा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम
३० डिसेंबर – भारत वि. श्रीलंका, पाचवा टी-२० सामना, तिरूवनंतपुरम