बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रवीण समजीस्कर मृत्यू प्रकरणातील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल 


बदलापूर :  सह्याद्री सुपर सपेशालिस्ट हॉस्पिटलमधील तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. योगेश मिंडे , डॉ अनंत ठाणगे आणि डॉ .मनीष वाधवा या तिघांची नावे या प्रकरणात आहेत.ही कारवाई प्रवीण समजीस्कर याच्या मृत्यू प्रकरणाशी संबधित आहे .


प्रवीण समजीस्कर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता .कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता .कुटुंबासोबत काही समाजसेवकांनीही गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरठा केला .


मिळालेल्या माहितीनुसार ,प्रवीण समजीस्कर दुचाकीवरून पडल्याने त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली होती . ही जखम साधी असतानाही हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला .


मात्र शस्त्रक्रिया करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला .या घटनेनंतर कुटुंबीयांनी मृत्यू संशयास्पद असल्याने तक्रारी केल्या होत्या .आरोग्य विभागाच्या चौकशीनंतर डॉक्टरांचा हलगर्जीपणा ठळकपणे समोर आला .त्यानंतर बदलापूर पश्चिम ठाण्यात तिन्ही डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले . एकाच वेळी तीन डॉक्टरांवर केस नोंद नोंदवल्याने बदलापूर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .

Comments
Add Comment

मुलीसाठी नग्न होऊन युद्धाचा भयंकर खेळ, जीव जाईपर्यंत… लग्नाची अजब परंपरा माहिती आहे का

  इथिओपिया : आफ्रिकेतील जमाती आपल्या खास परंपरांसाठी चर्चेत असतात. यातील काही परंपरा या खूप विचित्र असतात. आज

शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन वनराई बंधारे करणार

पंचायत समिती २१ बंधारे, कृषी कार्यालय बांधणार ५० शैलेश पालकर पोलादपूर : उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा