महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू, वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष गायन

नागपूर :  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने सुरूवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीगण यांच्यासह सभागृहाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले. विधानसभेप्रमाणेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने विधानपरिषदेत सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम् गीतास ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वंदे मातरम्‌चे संपूर्ण गायन करण्यात आले. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सदस्य व विधानपरिषद सदस्य उपस्थित होते.





वंदे मातरम आणि राज्यगीतानंतर, दोन्ही सभागृहांमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या मंत्र्यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित विविध अध्यादेश मांडले.




Comments
Add Comment

विधानपरिषद आणि विधानसभेचे तालिका अध्यक्ष जाहीर; ७५ हजार २८६ कोटी ३८ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : विधानपरिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर

वन विभागाचा मोठा निर्णय; बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका नातलगाला मिळेल सरकारी नोकरी

मुंबई : महाराष्ट्रात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाघांचे, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

बहुपत्नीत्वामुळे महिला संकटात

पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी