छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका ऐतिहासिक समारंभात, महाराष्ट्र सरकार आणि महावितरणने अधिकृतपणे घोषणा केली की राज्याने 'मागेल त्याला सौर पंप' उपक्रमांतर्गत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला. या योजनेत राज्याने एका महिन्यात एकूण ४५९११ सौरऊर्जा पंप स्थापना साध्य केले हा पहिल्यांदाच जागतिक विक्रम नोंदवण्यात महाराष्ट्र सरकार व महावितरणाला यश आले आहे. या सौरउर्जा योजनेत जगातील सर्वात मोठ्या आणि जलद अक्षय सिंचन उपयोजनापैकी एक मानली जाते.शक्ती पंप कंपनी १९८२ पासून नावीन्यपूर्णता आणि शाश्वततेसाठी ओळखली जाते या कंपनीच्या सहकार्याने पीएम कुसुम अंतर्गत सर्वाधिक देशांतर्गत बाजारपेठेतील वाटा असलेली कंपनीसह हा नवा विक्रमी प्रकल्प नोंदवला गेला. उपलब्ध माहितीनुसार, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनी ही विक्रमी कामगिरीत सर्वात मोठे योगदान देणारी कंपनी ठरली. त्यांनी ८८४६ सौर पंप बसवले आहेत, जे कोणत्याही सहभागी कंपनीपेक्षा सर्वाधिक आहे.
या सौर ऊर्जा प्रकल्पाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रयत्नासाठी ऑडिट केलेला विक्रमी कालावधी २७ ऑक्टोबर, रात्री १२:०१ ते २५ नोव्हेंबर, रात्री ११:५९ पर्यंत होता असे महाराष्ट्र सरकार व महावितरण यांच्या संयुक्त निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कामगिरीचे अधिकृत सादरीकरण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
'यामुळे महाराष्ट्र सौर शेतीसाठी भारतातील नंबर १ राज्य बनले आहे. ही कामगिरी सिंचन सुरक्षा सुनिश्चित करते, उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारते आणि पारंपारिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करते. राज्य सरकार ही गती वाढवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक लवचिक, शाश्वत आणि समृद्ध भविष्य निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या पुढाकाराबद्दल त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित केले.
'या कामगिरीमुळे महाराष्ट्र भारतातील सर्वात जलद सौर शेती करणारे राज्य आणि एकाच प्रशासकीय प्रदेशाद्वारे सौर पंप तैनात करण्याच्या प्रमाणात आणि गतीमध्ये जागतिक स्तरावर चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे' असे एका प्रेस निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्राने आतापर्यंत राज्यात ७.४७ लाख सौर पंप बसवले आहेत. १०.४५ लाख पंप बसवण्याचे लक्ष्य आहे.सरकारने सांगितले की सौर पंप बसवण्यासाठी दुष्काळग्रस्त क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पंपांचे आकारमान जमिनीच्या मालकीच्या आधारावर करण्यात आले होते. उदा. २.५ एकरपर्यंतच्या जमिनीसाठी ३ अश्वशक्तीचे पंप, ५ एकरपर्यंतच्या जमिनीसाठी ५ अश्वशक्तीचे पंप आणि मोठ्या शेतांसाठी ७ अश्वशक्तीचे पंप बसवण्यात आले.






