मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. सततचा प्रकाश, ताण, धूळ आणि कोरडेपणामुळे डोळे जळजळणे, धूसर दिसणे, संवेदनशीलता वाढणे अशी लक्षणं जाणवू लागतात. तज्ज्ञांच्या मते योग्य आहार घेतल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि दृष्टीही सुधारते. पोषक घटक डोळ्यांना नैसर्गिक संरक्षण देतात. ओमेगा-3, व्हिटॅमिन A, C, E आणि झिंक यांचा आहारात समावेश केल्यास दृष्टी आरोग्य मजबूत राहते.
डोळ्यांसाठी उपयुक्त आठ महत्त्वाचे पदार्थ
ओमेगा-3 युक्त मासे: सॅल्मन, टूना, सार्डिनसारखे मासे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करतात तसेच रेटिनाची कार्यक्षमता वाढवतात. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणाऱ्यांसाठी हे विशेष फायदेशीर मानले जातात.
सुकामेवा व डाळी: बदाम, काजू, शेंगदाणे आणि विविध डाळींमधील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या ऊती मजबूत करतात. वयानुसार दृष्टी मंदावण्याचा धोका कमी होतो.
हिरव्या भाज्या: पालक, ब्रोकली, सलाडसारख्या भाज्यांमध्ये ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन हे घटक असतात, जे प्रकाशामुळे होणारी हानी कमी करतात आणि दृष्टी स्थिर ठेवतात.
बीटा कॅरोटीनयुक्त पदार्थ: रताळे, स्क्वॅश, पालक आणि टरबूज यांसारखे पदार्थ शरीरात व्हिटॅमिन A तयार करण्यात मदत करतात. हे घटक कमी प्रकाशात पाहण्याची क्षमता वाढवतात.
गाजर – व्हिटॅमिन A: गाजर नियमित खाल्ल्यास रेटिना मजबूत होतो आणि डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो.
व्हिटॅमिन C भरपूर फळे: संत्रा, लिंबू, कीनू, स्ट्रॉबेरी आणि टोमॅटो यांसारखी फळे डोळ्यांचे पेशी फ्री-रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवतात. वयामुळे होणाऱ्या मोतीबिंदूपासूनही संरक्षण मिळते.
व्हिटॅमिन E: अवोकॅडो, बदाम आणि सूर्यफुलाच्या बियामधील व्हिटॅमिन E डोळ्यांच्या पेशींना होणारे नुकसान कमी करते.
झिंकयुक्त पदार्थ: राजमा, पोल्ट्री, फोर्टिफाइड धान्यांतील झिंक रेटिनाला संरक्षण देतं आणि दृष्टी स्थिर ठेवण्यास मदत करतं.
तज्ज्ञांचा सल्ला
योग्य आहार डोळ्यांना ताकद देतो; मात्र सतत जळजळ, धूसरपणा किंवा वेदना जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तळटीप : हा मजकूर संकलित आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.