एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला


उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा फुगा फुगवताना मृत्यू झाला. अचानक फुग्यातील रबरचा तुकडा तिच्या तोंडात शिरला आणि श्वास नलिकेत अडकला, ज्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.


बुलंदशहरच्या पहासू भागातील दिघी गावात ही धक्कादायक घटना घडली. आठवीत शिकणारी १३ वर्षांची कुमकुम हिने गावातील एका दुकानातून एक फुगा विकत घेतला आणि तिच्या धाकट्या भावाला फुगा फुगवून देण्यासाठी घरी आली. फुगा फुगवताना तो अचानक तिच्या तोंडात फुगा फुटला आणि फुग्यातील रबराचा तुकडा तिच्या श्वास नलिकेत अडकला. यानंतर कुटुंबीयांनी कुमकुमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. घटनेची माहिती देताना पाहसू पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कुमार म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात जाऊन माहिती गोळा केली. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, तिच्या श्वास नलिकेमध्ये फुग्याचा रबराचा तुकडा अडकल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणात कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा

गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली

पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग