पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात ५ पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये २० जण पबमधील कर्मचारी आणि ५ पर्यटक आहेत.
मृतांची नावे :
१) मोहित: झारखंड : स्टाफ २) प्रदीप महतो: झारखंड : स्टाफ ३) बिनोद महतो: झारखंड : स्टाफ ४) राहुल तंटी: आसाम : स्टाफ ५) सतीश सिंग: उत्तराखंड : स्टाफ ६) मनजोत मल : आसाम : स्टाफ ७) चूर्ण बहादूर पुन: नेपाळ : स्टाफ ८) सुरेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ ९) सुभाष चेत्री: दार्जिलिंग पश्चिम बंगाल : स्टाफ १०) जितेंद्र सिंग: उत्तराखंड : स्टाफ ११) सुमित नेगी: उत्तराखंड : स्टाफ १२) मनीष सिंग: उत्तराखंड : स्टाफ १३) विवेक कटवाल : नेपाळ : स्टाफ १४) साबिन: नेपाळ : स्टाफ १५) सुनीलकुमार: उत्तर प्रदेश : स्टाफ १६) दिगंबर पाटीर : आसाम : स्टाफ १७) रोहन सिंग: उत्तर प्रदेश : स्टाफ १८) डॉमिनिक: महाराष्ट्र : स्टाफ १९) मनोज जोरा : महाराष्ट्र : स्टाफ २०) सुदीप: नेपाळ : स्टाफ २१) इशाक: कर्नाटक : पर्यटक २२) सरोज जोशी: दिल्ली : पर्यटक २३) विनोद कुमार: दिल्ली : पर्यटक २४) अनिता जोशी: दिल्ली : पर्यटक २५) कमला जोशी: दिल्ली : पर्यटक
गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक
उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत किमान २५ लोक ठार झाले, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संबंधित नाइट क्लबला सील, तर क्लबच्या मालकांसह ४ जणांवर गुन्हा दाखल झाला असून मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. तसेच, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या भीषण आगीत किमान २५ लोक ठार झाले, तर अन्य ...
पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि जखमींबाबत विचारपूस केली. पीएमओने जाहीर केलेल्या अनुदानानुसार, मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.





