विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर : ‘मनात मांडे, पदरात धोंडे’, अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीला ती तंतोतंत लागू पडते. म्हणजे, पदरात पुरेसे संख्याबळ नसताना या आघाडीतील नेत्यांनी मोठमोठाली स्वप्ने पाहिली, अनेकांनी गुडघ्याला बाशिंगही बांधले, दिल्लीपर्यंत धावपळ केली, पण ‘पत्रिका’च जुळेना म्हटल्यावर लग्न तरी उरकणार कसे? शेवटी विधानसभेत १० टक्के संख्याबळाचा नियम आडवा आला. मग त्यांनी मोर्चा वळवला विधानपरिषदेकडे, तिकडे काही नियम नाहीत अशा पुड्या माध्यमांत सोडल्या आणि थेट सभापतींकडे प्रस्तावही पाठवला. पण तिथेही संख्याबळाची अट शिथिल होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच चालवले जाईल,अशी शक्यता आहे.


महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (सोमवार, ८ डिसेंबर) नागपूर येथे सुरुवात होत असताना राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार आहे. संख्याबळाच्या १० टक्के निकषामुळे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला हे पद मिळू शकणार नाही. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद सुरुवातीपासून रिक्त आहे, तर विधानपरिषदेत उबाठाचे माजी आमदार अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्टअखेर संपल्याने तेथेही हे पद रिक्त झाले आहे. दोन्ही सभागृहांत एकाच वेळी विरोधी पक्षनेता नसणे ही राज्याच्या राजकीय इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार आहे.


विधिमंडळ नियमांनुसार विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येचे किमान १० टक्के सदस्य (विधानसभेत २९, विधानपरिषदेत ८) आवश्यक असतात. मात्र सध्याच्या संख्याबळानुसार मविआतील कोणत्याही एका पक्षाकडे ही पात्रता नाही. यामुळे इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार आहे. दुसरे म्हणजे, हिवाळी अधिवेशनात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान, विशेष मतदारयादी पुनरावृत्ती कार्यक्रमातील गोंधळ, नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुकीतील राडे अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा अपेक्षित असताना विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीत मविआला आक्रमक भूमिका मांडणे कठीण जाणार आहे.


योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ : सभापती राम शिंदे


विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात राम शिंदे म्हणाले की, १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या प्रथा पंरपरा होत्या, त्यानुसार जे कामकाज झाले, तेच आता २०२५ मध्ये झाले पाहिजे, असे आपेक्षित नाही. विरोधी पक्षनेता निवडीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे. त्यावर विचार सुरु आहे, योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments
Add Comment

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात सलग दुसऱ्यांदा घसरण 'या' कारणामुळे घसरण

मोहित सोमण: आज नवा विशेष ट्रिगर दुपारपर्यंत नसल्याने व विशेषतः डॉलर निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती

ट्रिगर बिना शेअर बाजारात स्थिरता! आयटी शेअर्समध्ये तुफानी सेन्सेक्स १८७.६४ व निफ्टी १८७.६४ अंकांने उसळला!

मोहित सोमण: अखेर आज शेअर बाजारात नवा कुठला ट्रिगर नसल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकारात्मकता कायम

आता असूचीबद्ध शेअर सेबी रडारवर? पांडे यांचे मोठे विधान

सेबी सूचीबद्ध नसलेल्या शेअर बाजाराचे नियमन करण्यावर विचार करू शकते- तुहिन कांता पांडे प्रतिनिधी: सध्या

Nitesh Rane : हाहाहा, हीहीही..."उद्धवजी आणि पेग्विनला"; जय श्रीराम!"... नितेश राणेंनी उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

मुंबईत महायुतीची मुसंडी पाहताच भाजपचा प्रहार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत महायुतीने (भाजप-शिंदे गट)

WPI Inflation: घाऊक ग्राहक किंमत महागाईत डिसेंबरमध्ये किरकोळ वाढ 'या' कारणामुळे

मोहित सोमण: प्राथमिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने यंदा घाऊक ग्राहक किंमती निर्देशांकात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ०.८६%