चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल


मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नसल्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना खासगी शाळेची वाट धरावी लागत आहे. मात्र भरमसाठ शुल्क असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता शासकीय शाळेसाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
चेंबूर येथील भारतनगर परिसरातील माहुल गाव, गव्हाणपाडा, गडकरी खाण, विष्णूनगर, म्हाडा कॉलनी, अयोध्यानगर, शंकर देऊळ, आणिक गाव, मारवली गाव, रामनगर, कोंकणनगर, चेंबूर कॅम्प परिसरातील एकूण लोकसंख्या सहा ते आठ लाख आहे. भारतनगर, माहुल व अन्य परिसरात एमएमआरडीए वसाहत आणि झोपडपट्टी भागात बहुसंख्य मराठी भाषिक व कामगारवर्ग राहतो. या परिसरात खासगी इंग्रजी शाळा, आंतरराष्ट्रीय शाळा, पालिकेची पब्लिक शाळा आणि मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहेत; परंतु मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे पालकवर्ग, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


पालकांना खासगी शाळेचे भरमसाठ शुल्क भरणे परवडत नाही. त्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर दूर असलेल्या चेंबूर नाका येथील पालिकेच्या मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळेचा आधार घ्यावा लागत आहे. या त्रासामुळे काही विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाला रामराम ठोकला आहे.


पालिका, एमएमआरडीए प्रशासन माहुल, वाशी नाका परिसरातील इमारतीत प्रकल्पग्रस्त रहिवाशांचे पुनर्वसन करते. मात्र लोकसंख्येनुसार कोणतीही सुविधा देत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी केली जात आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या परिसरात माध्यमिक शाळा सुरू करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने