Sunday, December 7, 2025

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८ डिसेंबर) पासून नागपुरात सुरू होणार आहे. हे अधिवेशन रविवार (१४ डिसेंबर) पर्यंत चालेल. १३ डिसेंबर शनिवार व १४ डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने अधिवेशनावर आचारसंहितेची छाप दिसून येत आहे. यात कोणत्याही घोषणा होणार नसल्या तरी सरकारी कामकाज जोरात पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. सहा अध्यादेशांसह ११ विधेयकांचा अजेंडा असला तरी विधेयकाच्या यादीत अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त आहे.

शासनाने जाहीर केलेल्या सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रूपांतर या अधिवेशनात ठरणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (दुसरी सुधारणा), महाराष्ट्र दुकानं व आस्थापना, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रिकरण, मुंबई महापालिका, महाराष्ट्र महापालिका व नगर परिषद-नगरपंचायतीं व औद्योगिक नागरी (सुधारणा) याचा समावेश आहे.

पाच नवीन विधेयकांची नोंद होणार?

शासनाने या अधिवेशनात ५ नवीन विधेयकांची नोंद केली आहे. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक, महाराष्ट्र जनविश्वास विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था विधेयक, महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध विधेयक, महाराष्ट्र (तिसरी पुरवणी) विनियोजन विधेयकांचा समावेश आहे. या विधेयकांमध्ये महसूल, सामाजिक सुरक्षाव्यवस्था, वित्त व्यवस्थापन, भीकवृत्ती नियंत्रण आणि विश्वस्त व्यवस्थेतील पारदर्शकता वाढविणारी तरतुदी असल्याने त्यांची सर्वदलीय स्तरावर सखोल चर्चा अपेक्षित आहे.

Comments
Add Comment