मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहिणीही मनोरंजनविश्वात चमकत असतात. प्रियांकाची बहीण परिणीतीने निवडक चित्रपटांत काम केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार राघव चढ्ढा सोबत लग्न केले आहे तर मनारा चोप्रा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. मनारा बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती. बिग बॉसच्या बंगल्यातून बाहेर आल्यानंतरही सोशल मीडियातील विविध पोस्टमुळे मनारा सतत चर्चेत असते. अलिकडेच मनाराने निवडक फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले आहेत. यामुळे मनाराने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मनाराने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती बहरिनमध्ये हिजाबमध्ये वावरत असल्याचे दिसत आहे. एका मशिदीत फिरत मनाराने फोटो आणि व्हिडीओ काढले आहेत. बहरिनमधील सर्वात सुंदर मशिद असे सांगत मनाराने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मनाराचे हे फोटो आणि व्हिडीओ बघून अनेकांना धक्का बसला आहे. मनाराच्या फोटो आणि व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट येत आहेत.
एकाने कमेंट करत मनाराने इस्लाम धर्म स्वीकारल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसऱ्याने मनाराला हे सर्व करण्याची गरज होती का ? असा प्रश्न विचारला आहे. मनारा मशिदीतका केली हे अद्याप समजलेले नाही. पण मनाराचे फोटो आणि व्हिडीओ बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर मनाराला खडे बोल सुनावले आहेत.