प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत झालेल्या बिघाडामुळे विमान कंपनीने अनेक उड्डाणे रद्द केली असून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.देशातील प्रत्येक विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे. विमान रद्द झाल्यामुळे आणि विमान उशीर उड्डाण घेणार या बिनभरोसे कामकाजावर नाराजी व्यक्त करत तिकिटाची परतफेड करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यावर इंडिगोने महत्त्वाची माहिती दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून इंडिगोचे अनेक उड्डाणे रद्द केली जात असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच ही परिस्थिती एका रात्रीत सुटणार नसून लवकरात लवकर सर्व विमान सेवा पूर्ववत करण्यासाठी पथके काम करत आहेत, अशी महत्त्वाची माहिती इंडिगोने दिली आहे. दरम्यान सर्व रद्दीकरणांसाठी पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे मूळ पेमेंट पद्धतीवर केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.


याबाबत इंडिगोने द्विटरवर पोस्ट केली असून त्यामध्ये, इंडिगोने कबूल केले की अनेक प्रवाशांना रद्दीकरण, विमानतळांवर दीर्घ प्रतीक्षा वेळ आणि मर्यादित माहितीचा सामना करावा लागला. मात्र शनिवारपासून हळूहळू सुधारणा करण्यासाठी सर्व सिस्टम आणि वेळापत्रक रीबूट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.






एअरलाइनकडून बाधित प्रवाशांसाठी उपाययोजना जाहीर



  • सर्व रद्दीकरणांसाठी पूर्ण परतफेड स्वयंचलितपणे मूळ पेमेंट पद्धतीवर केली जाईल.

  • ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान बुकिंगसाठी रद्दीकरण आणि रीशेड्युलिंग शुल्कावर पूर्ण माफी.

  • प्रवाशांसाठी शहरांमधील हॉटेल रूम आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • विमानतळांवर जेवण आणि नाश्ता दिला जात आहे.

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी शक्य असेल तिथे लाउंज अक्सेसची व्यवस्था केली जात आहे.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय