इन्कम टॅक्स झाले जीएसटी झाले आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 'कस्टम बॉम्ब' दिल्लीत मोठे विधान

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी मोठे विधान केले आहे. थेट कस्टम ड्युटी करात मोठे बदल होणार असल्याची घोषणा यावेळी केली. कार्यक्रमात बोलताना, जीएसटी, इन्कमटॅक्सनंतर आता कस्टम करात बदल होणार आहेत असे मोठे विधान केले आहे. याविषयी सरकार काम करत असून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे अर्थमंत्र्यांनी बोलताना अधोरेखित केले आहे. सरकारच्या कामगिरीवर विचारले असता अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत फंडामेंटलवर (Sorted) असल्याचे विधान केले. परंतु ज्यामध्ये परिवर्तन अपेक्षित आहे त्यामध्ये कस्टम ड्युटीचा 'हेवी ड्युटी' असल्याने त्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे. यातील नियमही सोपे करून विरोधकांच्या काळातील क्लिष्ट व महागडा कर लादणारा कर दहशतवाद बंद करण्याची गरज असल्याचे सीतारामन यांनी अधोरेखित केले आहे.


त्यामुळे आगामी दिवसात सरकार यावर नवीन कायदा आणू शकतात ज्यात मोठ्या प्रमाणात जीएसटीप्रमाणे दरकपात होईल अशी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर बोलतानाही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असताना काही भूराजकीय स्थितीतील कारणांमुळे निश्चितच आव्हाने आहेत. परंतु त्यावर जागतिक दर्जाशी सुसंगत उपाययोजना भारतात असल्यातरी त्याची प्रभावी अंमलबजावणी आणखी केली पाहिजे याची कबूली त्यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.


याविषयी बोलताना सीतारामन म्हणाल्या आहेत की,'अर्थसंकल्पीय गुपित नाही' असे म्हणत मी अर्थसंकल्पासमोर हे गुपित उघड करत नाही असे म्हणत भारत जागतिक मान कांशी (Standard) व्यापकपणे जुळवून घेत असला तरी अंमलबजाव णीत अडचणी येत आहेत यावर भर दिला. पूर्वीच्या कर सुधारणांचा विचार करताना त्या म्हणाल्या आहेत की,'आयटीमध्येही कर प्रशासनच समस्या निर्माण करते ज्यामुळे कर दहशतवाद निर्माण झाला. म्हणून आम्ही आयटीवर काम केले आणि ते सोपे केले, ते चेहरारहित केले आहे '.


बेकायदेशीर तस्करी (Smuggling) ही एक मोठी चिंता आहे त्यामुळे आता कस्टम (सीमाशुल्क प्रक्रिया) सर्वसमावेशकपणे चेहरारहित (Faceless) करण्याची आहे असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नमूद केले. आपण अजूनही असलेल्या कस्टमचा उच्च असलेल्या ठिकाणी दर खाली आणावे लागतील असे कस्टम्ससाठी पुढील मोठे स्वच्छता काम' असे संबोधले आहे.याशिवाय अर्थसंकल्प निर्माण करण्यापूर्वी रूपयावरही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


सध्याच्या आर्थिक मूलभूत तत्त्वांच्या संदर्भात चलनाचे मूल्यांकन केले पाहिजे. त्या म्हणाल्या, 'रुपयाला स्वतःची पातळी शोधावी लागेल' विनिमय दरांना अत्यंत संवेदनशील असे त्यांनी संबोधले आहे. यावेळी सीतारामन यांनी विरोधी पक्षाची सत्ता असताना तेव्हा अर्थव्यवस्थेची स्थिती 'दयनीय' असल्याचे म्हटले आहे.


अर्थव्यवस्थेतील बदलांवर विचारले असताना त्या म्हणाल्या आहेत की,'आज अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांचे निराकरण झाले आहे असे म्हणत त्यांनी पुढे म्हटले की चालू चलन चर्चेला आजच्या आर्थिक वास्तवात पाहिले पाहिजे, पूर्वीच्या संदर्भापेक्षा (Context) आजच्या वास्तवाशी ते जोडणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.


व्यापक अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताला बाह्य धक्क्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. कोविड-१९ आणि इतर देशांतील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) विस्कळीत झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आणि असेही म्हटले की, भारत प्रशासनातील अकार्यक्षमतेची भरपाई करत आहे. निवडणूक चक्राचा निश्चित भांडवली खर्चावर परिणाम झाला आहे आणि अर्थव्यवस्था अनेक आव्हानांमधून गेली आहे, त्यापैकी बहुतेक आव्हाने देशाबाहेरून उद्भवली आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भारतीय अर्थव्यवस्था अनेक मोठ्या बदलांमधून जात आहे हे अंतिमतः त्यांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

अवधूत साठे यांनी सेबीला साफ 'नाकारले' साठे ट्रेडिंग ॲकेडमी सेबी निर्णयाला आव्हान देणार

मुंबई: अवधूत साठे यांच्या अवधूत साठे ट्रेडिंग ॲकेडमी लिमिटेड (ASTAL) कंपनीने सेबीच्या आरोपांना फेटाळले असून

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची संविधानाच्या डिजिटल चित्ररथाद्वारे मानवंदना

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  मुंबई: राज्य

भारत व रशिया यांच्यातील अणुभट्ट्या प्रकल्पांना वेग पुतीन व मोदी यांच्यात महत्वाची चर्चा

नवी दिल्ली: भारत व रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देश आता नव्या एकत्र येत

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि

ज्ञानाच्या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन... भाषणाची सुरुवात करताना लक्षात ठेवा 'हे' मुद्दे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. या