दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान भारतीय जलतरणपटू होण्याचा मान पटकावत इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या ९ महिन्यांची असताना पाण्यात हातपाय मारून तिने आपली क्षमता दाखवून ती कोकणची ‘जलपरी’ ठरली आहे.


वेदाचा मोठा भाऊ रूद्र हा राज्यस्तरीय जलतरणपटू. त्याच्या सरावासाठी आई पायल सरफरे रोज शासकीय जलतरण तलावावर जायची. त्या दरम्यान तलावाजवळ बसणारी वेदा पाण्याकडे आवडीने पाहायची. एके दिवशी प्रशिक्षक महेश मिलके यांनी तिला पाण्यात सोडलं; पण अपेक्षेप्रमाणे ती रडली नाही. उलट पाण्यात सहज हातपाय मारत तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं.


१०० मीटरचा वेगवान विक्रम


नित्य सरावामुळे वेदा काही महिन्यांतच पोहण्यात पारंगत झाली. वयाच्या १ वर्ष ९ महिन्यांत तिने १०० मीटर पोहण्याचं अंतर फक्त १० मिनिटे ८ सेकंदांत पूर्ण करत विक्रम रचला. इतक्या लहान वयात इतकं मोठं अंतर पूर्ण करणारी वेदा देशात प्रथम ठरली आहे.वेदा जलतरण तलावाच्या कठड्यावरून सहज पाण्यात झेपावते. पाण्याशी झालेली तिची ‘मैत्री’च तिला थेट रेकॉर्ड बुकपर्यंत घेऊन गेली आहे. तिच्या या यशाने रत्नागिरीचे नाव देशभरात झळकले आहे.

Comments
Add Comment

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे हस्तांतरित करू नये

उच्चाधिकार समितीचा निकाल सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर ‘ये-जा’ करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’कडे

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा