अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद


मुंबई : लहान वयात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांच्या नशीबात अतिशय हालाखीचे दिवस येतात. शिक्षण आणि रोजगार दूरच, ही मुले कायमस्वरुपी प्रवाहाबाहेर फेकली जातात. ही बाब गंभीरपणे विचारात घेऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १७ जानेवारी २०१८ रोजी अनाथांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या ऐतिहासिक निर्णयामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक अनाथ मुले शासकीय सेवेत दाखल झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या तिसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाची पहिली वर्षपूर्ती अनाथ मुलांसोबत साजरी करत, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.


यानिमित्ताने वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘कृतज्ञतेचा आनंद’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या अनाथ लाभार्थी मुला-मुलींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवळून संवाद साधला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्तीच्या निमित्ताने अनेक चांगले कार्यक्रम आयोजित केले, पण सगळ्यात जास्त आनंद या मुलांसोबत साजरा करताना येतोय. निःशब्द भाव खूप काही बोलून जातो. कार्यातून समाजपरिवर्तन घडवणे, हेच खरे समाधान आहे”, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


 



 

या कार्यक्रमाला उपस्थित अनाथ लाभार्थ्यांनी आपल्या यशोगाथा आणि संघर्षकथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. अनेकांनी ही योजना आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरल्याचे सांगितले. यावेळी तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्रीकांत भारतीय, भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी सर्वांना शुभेच्छा देत, अनाथ मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.


बाबासाहेबांच्या तत्त्वावर आधारित निर्णय




  1. मुख्यमंत्री म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संधीची समानता या तत्त्वावर आधारित हा ऐतिहासिक निर्णय आहे. या एका निर्णयामुळे आज ८०० हून अधिक अनाथ तरुण-तरुणी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. हे सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.”

  2. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत ते म्हणाले, “व्यक्तीपेक्षा तिचं कार्य जास्त काळ जिवंत राहतं. या दोन्ही महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने कायमस्वरूपी वारसा निर्माण केला. आपणही आपल्या कामातून अशी वारसा उभा करूया”, असे आवाहन त्यांनी केले.

  3. “समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. ते समाजालाच परत करणे, हे खरे उत्तरदायित्व आहे. अनाथांसाठी सहवेदना, संवेदनशीलता आणि सातत्याने योगदान द्या. थांबू नका, सतत पुढे जात राहा”, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ