नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. या मागणीवर अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नेरुळ-उरण-नेरुळ आणि बेलापूर-उरण-बेलापूर या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले आहे. त्यामुळे आता नेरुळ-उरण मार्गावर ४ फेऱ्या तर बेलापूर-उरण मार्गावर ६ फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या उपनगरीय सेवांमध्ये तारघर आणि गव्हाणे स्थानकाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.
मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या नेरूळ ते खारकोपर रेल्वेसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर उरणकरांना सुद्धा उपनगरीय रेल्वे सेवेची प्रतीक्षा होती. उरण रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी स्थानक उभरणीपासून सुरुवात असतानासुद्धा अनेक अडथळ्यांनंतर अखेर उरण रेल्वे सेवा सुरू झाली. ज्याचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र उरण रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांची कामे प्रलंबित असल्यामुळे रेल्वे सेवा सुरू झाली नव्हती.
नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' हे विधेयक सादर करण्यात ...
महत्त्वाचे म्हणजे उरण भागातून बहुतेक चाकरमानी मुंबई, नवी मुंबईमध्ये कामानिमित्त ये-जा करतात. तसेच अनेक विद्यार्थी मुंबई, पनवेल, नवी मुंबईमध्ये शिक्षणासाठी येतात. मात्र स्थानकांची कामं अपूर्ण असल्यामुळे त्यांना खासगी वाहनांनी मुंबई, नवी मुंबईकडे प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता केंद्र सरकारने दाखवलेल्या हिरव्या कंदीलामुळे लवकरच उरण उपनगरीय सेवा सुरू होणार आहे. ज्यामध्ये तारघर आणि गव्हाण या स्थानकांनाही मंजूरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होणार असून नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.