डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. मावळते अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्याकडून ढाकणे यांनी हा पदभार स्वीकारला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी डॉ. ढाकणे यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ढाकणे यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली.

डॉ. ढाकणे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सन १९९४ मध्ये नाशिक येथे उप जिल्हाधिकारी म्हणून झाली. डॉ .ढाकणे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २०१० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आजवरच्या ३१ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र शासनाच्या वित्त व उद्योग मंत्रालयात अतिरिक्त खासगी सचिव, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांची जबाबदार पार पाडली आहे.

तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) आणि मालेगाव येथे उप विभागीय अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात खासगी सचिव, ऊर्जा मंत्रालयात खासगी सचिव, ‘महानिर्मिती’चे कार्यकारी संचालक, वित्त मंत्री यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळात सह व्यवस्थापकीय संचालक, मुंबईत अपर जिल्हाधिकारी व नियंत्रक (अतिक्रमण निर्मूलन / निष्कासन), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अलीकडे ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते.
Comments
Add Comment

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज ‘शाळा बंद’

एक दिवसाचे वेतन कापण्याचा संचालनालयाचा इशारा मुंबई : शिक्षकांचे समायोजन, टीईटी सक्ती, ऑनलाईन व अशैक्षणिक