मोहित सोमण:आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद बाजारात दिलाच परंतु याचा फटका रूपयाला बसला आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी ८९.४९ रूपये प्रति डॉलर असलेला ८९.६९ रूपयावर पोहोचला होता जो तब्बल २० पैशाने वाढला होता. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दर ५.५०% वरून ५.२५% दरकपात केल्याने रूपया आणखी २० पैशाने वाढला असून ८९.६९% वरून ८९.८९ रूपये प्रति डॉलरवर पोहोचला असल्याने एका तासात ४० पैशाने घसरला असल्याचे बाजारात दिसले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना अद्याप आपल्या गुंतवणूकीत अपेक्षित वाढ केली नसली तरी मोठ्या प्रमाणात डॉलरच्या गुंतवणूकीत भारतीय बाजारात वाढ सुरु झाल्याने रूपया आणखी घसरला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सकाळी आंतरबँकिंग परकीय चलन बाजारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८९.८५ वर उघडला तो सकाळच्या व्यवहारात ८९.६९ रूपयावर सावरला. तरी देखील त्याच्या मागील बंदपेक्षा २० पैशांनी वाढला. परंतु यापूर्वीच तज्ञांनी यापूर्वीच दरकपातीतील पार्श्वभूमीवर चलनाची आधीच नाजूक स्थिती पाहता कोणतेही संकेत रुपयावर नवीन दबाव आणू शकतात असे म्हटले होते.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा (Sale off) दबाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेस झालेला विलंब यामुळे असलेली भूराजकीय स्थितीचा आढावा घेता यामुळे रुपयावर परिणाम झाला आहे. काल रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवरून २६ पैशांनी वाढून ८९.८९ वर बंद झाला होता.
याविषयी सत्राच्या सुरुवातीला निर्णय जाहीर होण्यापूर्वी, 'आज सकाळी, सर्वांच्या नजरा आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे आहेत. भारताच्या अत्यंत कमी महागाईमुळे दर कपात किंवा भविष्यात संभाव्य कपातीचा संकेत रुपयावर अधिक परिणाम करू शकतात' असे सीआर फॉरेक्स अॅडव्हायझर्सचे एमडी अमित पाबारी म्हणाले होते.