मोहित सोमण
वयाच्या २९ व्या वर्षी अब्जाधीश होणे शक्य आहे का? आहे हा पराक्रम एका ब्राझीलीयन मुलीने करून दाखवला आहे. वयाच्या २९ व्या वर्षी जगातील प्रथम अब्जाधीश होण्याचा मान तिने मिळवला आहे. तो पण स्वतः कर्तुत्वाने ते ही एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन... कधी कधी या गोष्टी मनाला आसरा देतात तर कधी कधी दबावही निर्माण करतात. आपण कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीने पाहतो यावर पुढील गणित अवलंबून असते. याच दृष्टीकोनातून दुष्टचक्रात न बसता या अब्जाधीश तरूणीचे नाव आहे लुआना लोप्स लारा एक ब्राझील देशातील मोठी उद्योजक जिचा डंका पूर्ण जगात सुरु आहे. सर्वसामान्य घरातील या मुलीने विख्यात उद्योजक म्हणून नाव कमावले खरे पण त्यामागील कथाही रोजक आहे. एक थिएटर संस्थेत बॅलेरिना या प्रकारातील नृत्यांगना होत तिने आपल्या शिक्षणाची सुरुवात केली. त्या शाळेचे नाव होते बोलशोय (Bolshoi) आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत तिने सुरूवात करत हळूहळू मोर्चा अभ्यासात वळवला. अध्ययनात तर ती हुशार होतीच पण त्याहून ती अधिक हजरजबाबी होती. आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक सोने व कांस्य पदक आपल्या जोरावर मिळवली. तस आई गणिताची शिक्षक व वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर.... त्यामुळे हा वारसा घरातूनच मिळवला होता.
त्यावर आपल्या बुद्धीमत्तेचा मुलामा देत तिने आपल्या विशेषकृत अभ्यासाला सुरूवात केली बघता बघता आपले शिक्षण पूर्ण केले. गणित व विज्ञानाची तिला 'मास्टर' समजले जात असे ज्यात तिने याआधीही अनेक पदके मिळवली होतीच. त्याचा शैक्षणिक फायदा घेत लुआनाने अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिकडची ज्ञानाची जोड व आपल्या स्वप्नाची भूक यांचा मेळ घालण्यासाठी तिने युएस व जगातील दिग्गज कंपन्या सिटाडेल, ब्रीजवाटर असोसिएटस, फाईव्ह रिंग कॅपिटल अशा नामी ट्रेडिंग कंपन्यांमध्ये काम केले. न्यूयॉर्क येथे २०१८ कालावधीत तिने आपला मित्र तारेक मनसौर (Tarek Mansour) याबरोबर इंटर्नशिप करताना तिच्या मनात आपली कंपनी कालशी (Kalshi) कल्पना सुचली. मागे वळून न पाहता तिचा भरारी सुरु घेण्याचा प्रवास सुरू झाला बघता बघता मोठी उद्योजक झाली.
गोष्ट इथे संपत नाही.....
यापुढे या जोडीने नियुक्त करार बाजार म्हणून काम करण्यासाठी कायदेशीर पाठपुरावा केला ज्याचा फायदा होत त्यांनी आज एक मोठा यशाचा कल्पवृक्ष उभारला आहे.महत्त्वपूर्ण नियामक (Regulatory Challenges) आव्हाने आणि कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन (CFTC) सोबत कायदेशीर लढाया देखील यात समाविष्ट होत्या. अखेर सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी एक महत्त्वाचा खटला जिंकला, ज्यामुळे अमेरिकन निवडणूक व्यापार नियंत्रित झाला. ब्रेक्झिट जनमत चाचणीसारख्या मोठ्या मॅक्रो घटनांपासून बचाव करण्यासाठी आर्थिक साधनांचा अभाव पाहून, इंटर्नशिप दरम्यान परिमाणात्मक ' क्वांटिटिटिव व्यापारी म्हणून काम करत असताना त्यांनी कलशीची (Kalshi) या स्टार्टअप कंपनीची कल्पना सुचली आणि मग मोठा प्रवास सुरू झाला.
तत्पूर्वी तंत्रज्ञान आणि वित्त क्षेत्रातील कारकिर्दीपूर्वी, लोपेस लारा एक व्यावसायिकरित्या प्रशिक्षित बॅलेरिना होती. ज्याचा मोठा फायदा युएसमध्ये गेल्यावर तिला झाला. कारण चिकाटी, परिश्रम करण्याची झंझावाती वृत्ती, आणि बंडखोरपणा रक्तात भिनला गेला. त्याचाच परिपाक म्हणून आज ती सर्वात तरूण उद्योजक बनली तरी सुरूवातीच्या काळात तिने ब्राझीलमधील बोलशोई थिएटर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि ऑस्ट्रियामध्ये व्यावसायिक यशस्वी कामगिरी केली ज्या वातावरणाचे वर्णन तिने एमआयटीपेक्षा अधिक तीव्र असे केले होते. यांतून नव्या गोष्टी शिकत तिने कलशीची स्थापना केली.विद्यमान वित्तीय उत्पादन रचना अथवा गुंतवणूक जटील प्रकियेवर आधारित होती. ती सोपी व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी लुआनाने नवीन संरचना (Structure) व्यवसायासाठी बनवली. परंपरागत उद्योग प्रणालीची अकार्यक्षमता ओळखून तारेक आणि लुआना यांना एक सोपी, अधिक थेट देवाणघेवाण तयार करण्याची प्रेरणा मिळाली जिथे लोक विशिष्ट घटनांच्या परिणामांवर व्यापार करू शकतील.
२०२० मध्ये, कलशीने अमेरिकेतील विशेषतः इव्हेंट कॉन्ट्रॅक्टसाठी पहिले पूर्णपणे नियंत्रित वित्तीय एक्सचेंज बनून इतिहास घडवला ज्याला कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन (CFTC) द्वारे अधिकृतपणे नियुक्त केलेले कॉन्ट्रॅक्ट मार्केट (DCM) म्हणून नियुक्त केले गेले. या मंजुरीने कलशीला शिकागो मर्केंटाइल एक्सचेंज (CME) आणि इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE) सारख्या स्थापित एक्सचेंजेसच्या बरोबरीने ठेवले, इव्हेंट ट्रेडिंगमध्ये स्थान मजबूत केले आणि किरकोळ आणि संस्थात्मक सहभागींसाठी एक सुरक्षित, अनुपालन प्लॅटफॉर्म ऑफर केला.
२०२४ मध्ये, कलशीने युएसमधील कायदेशीर निवडणूकीतील व्यापार गुंतवणूकदारांना ऑफर करणारा शतकाहून अधिक काळातील पहिला पूर्णपणे नियंत्रित प्लॅटफॉर्म बनून एक ऐतिहासिक टप्पा गाठला. यावर तत्कालीन सरकारने आक्षेप नोंदवला असला तरी फेडरल अपील कोर्टाच्या निर्णयानंतर कंपनीला हिरवा कंदील मिळाला ज्याने युएस काँग्रेसचे नियंत्रण आणि अध्यक्षीय निवडणुकांसह राजकीय निकालांवर करार सूचीबद्ध (Listed) करण्याचा कलशीचा अधिकार कायम ठेवला. न्यायालयाने असे ठरवले की कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन (CFTC) ने अशा करारांमुळे सार्वजनिक हित किंवा एजन्सीला हानी पोहोचेल याचे पुरेसे पुरावे दिले नाहीत. परिणामी, कलशीचे निवडणूक बाजारातील अमेरिकन कायदे आणि नियामक मानकांचे (Regultory Standard) काटेकोरपणे पालन करतात ज्यामुळे अमेरिकन लोकांना निवडणुकीच्या निकालांवर व्यापार करण्यासाठी कायदेशीर मार्ग मिळतो असे कलशीने नंतर स्पष्ट केले. असे असताना संघर्ष किती उपयोगी पडतो त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कलशी अथवा लुआना आहे.
कलशी नक्की काय आहे?
कलशी हे पहिले CFTC नियंत्रित एक्सचेंज आहे जे भविष्यातील घटनांच्या परिणामांवर व्यापार करण्यासाठी समर्पित आहे. महागाईपासून, फेड दरापर्यंत, बेरोजगारीपर्यंत, सरकार बंद करेल का यापर्यंत, कल्शी लोकांना विविध विषयांवर व्यापार करण्याची परवानगी देते. लोक हेजिंग निमित्ताने यावर व्यापार करु शकतात. तसेच आपल्या दुरदृष्टीचा वापर करत आपली गुंतवणूक सुरक्षित स्थितीत नेऊ नकतात.
कंपनीने नवीन मालमत्ता वर्ग निर्माण करत इव्हेंट कॉन्ट्रॅक्ट विकसित केले आहेत जिथे तुम्ही एखादी घटना घडेल की नाही या संदर्भात हो किंवा नाही पोझिशन्स खरेदी करू शकता. कंपनीचा दृष्टिकोन म्हणजे लोकांना त्यांच्या मतांचा फायदा घेण्याचा दररोजच्या क्षेत्रात व्यापार करण्याची आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम रोखण्याची परवानगी देणे यांचा निश्चितच फायदा सामान्य माणसाला होतो. ही कल्पकता लढवत लुआनाने आपली खिंड लढवली त्याचे यशही मिळवले खरे पण ते इतके सोपे नव्हते. अखंड मेहनत, दुरदृष्टी, जोखीम घेण्याची तयारी या जोरावर तिने आपल्या संपत्तीत टेलर स्विफ्टलाही मागे टाकत सर्वाधिक लहान वयाची अब्जाधीश म्हणून यश मिळवले आहे. उपलब्ध माहितीनुसार कंपनीच्या भागभांडवलात लुना यांचा १२% हिस्सा (Stake) आहे तर केवळ या हिस्साचे मूल्यांकन १.३ अब्ज डॉलरमध्ये सांगितली जाते.
लुआनाची संपत्ती -
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जूनमध्ये २ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावरून १ अब्ज डॉलर्सच्या निधी फेरीनंतर (Funding Round) नंतर कलशीच्या मूल्यात प्रचंड मोठी वाढ झाली. या निधीमुळे दोन्ही सह-संस्थापक आता अब्जाधीशांच्या यादीत पोहोचले आहेत. लुआना लारा यांचा कलशीमध्ये अंदाजे १२% हिस्सा आहे. त्यांची वैयक्तिक निव्वळ संपत्ती अंदाजे १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक वाढली आहे.
रिपोर्टनुसार, अमेरिकेत फोर्ब्सच्या ३० वर्षांखालील ३० प्रभावी व्यक्ती यादीत ती यापूर्वी एकमेव ब्राझिलियन होती. लोपेस लाराने वयाच्या २९ व्या वर्षी हा दर्जा मिळवला आहे ही एक मोठी गोष्ट आहे. टेलर स्विफ्ट आणि लुसी गुओ सारख्या मागील विक्रमधारकांना तिने मागे टाकले. जूनमध्ये २ अब्ज डॉलर्सवरून ऑक्टोबरमध्ये ५ अब्ज डॉलर्स झाले आहे आणि आता ते ११ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.
त्यामुळे आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन असेल लढण्याची जिगर असेल किंवा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असेल तर जगात काहीही म्हणजे काहीही करणे सोपे आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लुआना लोप्स लारा आहे. तिच्या या जिद्दीला सलाम !