मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सनदी अधिकारी अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ अमित सैनी हे अभियंत्यांच्या बढती आणि बदलीमुळे वादात अडकले होते आणि त्यांनी केलेल्या बदली तथा बढतींना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे सैनी यांची बदलीची जोरदार हवा असतानाच आता त्यांच्या जागी अविनाश ढाकणे यांची वर्णी लावण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीची सेवा पूर्ण केल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे)आश्विनी भिडे यांची बदली झाल्यानंतर १९ मार्च २०२४ रोजी त्यांच्या रिक्त जागी डॉ अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातील काही महिने महापालिकेत मन न रमलेल्या सैनी यांनी बदलीसाठी प्रारंभी बराच प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर बदलीची शक्यता नसल्याने त्यांनी अखेर महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली. सैनी यांच्याकडे पूर्व उपनगरे विभागाचा पदभार होता आणि त्यांच्या प्रमाेशन कमिटी, नगर अभियंता, उद्यान, राणीबाग तसेच कोस्टल रोड आदींचा पदभार होता. मागील काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी मंजुरी दिलेल्या १२२ तसेच ३४ अभियंत्यांच्या बदलीबाबत अनियमितता झाल्याची बाब लक्षात येऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदली आदेशाला स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार महापालिकेतील १५६ अभियंत्यांच्या बदलीला आयुक्तांनी स्थगिती दिली होती. या प्रकरणावरून सैनी हे वादात अडकले होते.


परंतु आता सैनी यांच्या जागेवर अतिरिक्त आयुक्त म्हणून अविनाश ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अविनाश ढाकणे हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे सदस्य सचिव पदावर कार्यरत होते आर्णि समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी त्यांनी मानक कार्यपध्दती तयार केली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती समुद्रात विसर्जन करु नये यासाठी त्यांनी मंडळाच्या माध्यमातून महत्वपूर्ण भूमिका बजावण्याचे काम केले होते.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून