हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा अशा दोन पुरुषांची आहे, जे विरुद्ध स्वभावाचे, विचारसरणीचे आहेत आणि ते काही कारणास्तव समोरासमोर येतात. त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि हास्याचा धडाका!


या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनय क्षेत्रातील अनुभवी तसेच तरुण कलाकारांची मजबूत फळी. भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, नेहा कुलकर्णी, गौरी महाजन, कृष्णा चतुर्भुज, नामांतर कांबळे, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि आनंद इंगळे व वैभव मांगले अशा ताकदीच्या कलाकारांनी सजलेले हे नाटक रंगभूमीवर नक्कीच धमाल घडवणार आहे.


नाटकातील गंमतीजंमती, घरगुती प्रसंग आणि प्रत्येक पात्रामागची वेगळी भावनात्मक बाजू प्रेक्षकांना हसवत लोटपोट अनुभव देईल. रत्नाकर मतकरींच्या लेखनाची सहजसुंदर शैली आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहे. भूमिका, प्रवेश क्रिएशन्स, असंम्य थिएटर्स निर्मित व रत्नाकर मतकरी लिखित ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच निर्माते श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे व अजय विचारे हे आहेत. हास्याचे वादळ घेऊन येणारे ‘एकदा पाहावं करून’ या नाटकाचा शुभारंभ ६ डिसेंबर रोजी पुण्यातील भरत नाट्य रंगमंदिर येथे होणार आहे.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.