Dattatreya Jayanti 2025 : त्रिमूर्ती स्वरूप, २४ गुरूंचे ज्ञान! आदिगुरु दत्तात्रेय कोण? मार्गशीर्ष पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय?

सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने, दरवर्षी हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज गुरुवार, ४ डिसेंबर रोजी यावर्षी दत्तात्रेयांचा हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान दत्तात्रेयांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे एकत्रित अवतार म्हणून केले आहे. असे मानले जाते की, केवळ दत्तात्रेयांची पूजा केल्याने भक्तांना त्रिमूर्तीची पूजा केल्यासारखेच फळ मिळते. त्यामुळे आजच्या या पवित्र दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरे, मठ आणि आश्रमांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.



आदिगुरु दत्तात्रेय कोण आहेत?


आज, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा दत्त जन्मोत्सव भक्तांसाठी आध्यात्मिक यश मिळविण्याचा एक विशेष प्रसंग असतो. धार्मिक मान्यतेनुसार, या पवित्र दिवशी दत्त महाराजांची पूजा केल्यास लवकर अपेक्षित यश मिळते. असे मानले जाते की, या शुभ दिवशी गंगा नदीत स्नान करून पूर्वजांना प्रार्थना केल्यास व्यक्तीला मागील जन्मांतील पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, भगवान दत्तात्रेयांचा जन्म महान ऋषी अत्रि आणि त्यांची धर्मपत्नी माता अनसूया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन आहे. दत्तात्रेय केवळ त्रिमूर्तींचे रूप नाहीत, तर ते त्यांच्या २४ गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी मनुष्येतर प्राणी, पक्षी, आणि निसर्गातील घटकांकडून २४ गुरूंच्या माध्यमातून शिक्षण घेतले होते. असे आदिगुरु असलेल्या दत्तात्रेयांचे स्मरण आणि पूजन करणे हे गुरुतत्त्वाचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते.




कधी आहे मार्गशीर्ष पौर्णिमा


पौर्णिमा तिथीची सुरुवात आज गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी ८. ३७ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शुक्रवार, ५ डिसेंबर सकाळी ४. ४३ वाजता होणार आहे.



दत्त जयंती पूजेसाठी मुहूर्त


दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी ५:१४ ते ६:०६ वाजेपर्यंत आहे. यावेळी अभिजित मुहूर्त असणार नाही. तर संधिप्रकाश मुहूर्त संध्याकाळी 5.58 ते 6.24 वाजेपर्यंत असेल. अमृत काळ दुपारी १२. २० ते १.५८ वाजेपर्यंत असेल.



दत्त जयंतीला या पद्धतीने करा पूजा


मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आवरुन झाल्यानंतर उपवास आणि पूजा करण्याचे व्रत घ्या.



कोणत्याही शुभ मुहूर्तावर पूजा करा



  • दत्त जयंतीची पूजा करताना एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगांचे वस्त्र पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर दत्ताची मूर्ती ठेवा.

  • त्यानंतर दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करा.

  • यानंतर, शुद्ध तुपाचा दिवा लावा.

  • भगवान दत्तात्रेयांना गुलाल, अबीर, चंदन, पवित्र धागा इत्यादी अर्पण करा.

  • आरती करुन घ्या आणि नैवेद्य अर्पण करा.

  • शक्य असल्यास, पूजेनंतर गरजू लोकांना अन्न, धान्य, कपडे इत्यादी दान करा.


दत्त जयंतीचे विशेष महत्त्व


सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींचे अवतार मानले जातात. त्यांचे वर्णन तीन डोके आणि सहा हात असलेले तेजस्वी देव म्हणून केले जाते. ते त्यांच्या सर्व हातांवर विविध अलंकार धारण करतात. धार्मिक मान्यता अशी आहे की, दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्यास तिन्ही देवांचा (ब्रह्मा, विष्णू, महेश) आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त होतो. यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात. वैष्णव आणि शैव पंथांमध्ये भगवान दत्तात्रेयांना गुरुस्वामी, गुरुराज आणि गुरुदेव म्हणून आदराने पूजले जाते. त्यांचे विशेषतः दक्षिण भारतात अनेक भव्य मंदिरे आढळतात आणि हा उत्सव तिथे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो. इतकेच नव्हे तर, नाथ पंथ आणि सूफी पंथाचे लोक देखील भगवान दत्तात्रेयांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची पूजा करतात.




या मंत्रांचा करा जप


ओम द्रां दत्तात्रेय नम:
ओम श्री गुरुदेव दत्त


याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र, अवधूत गीतेचे श्लोक, गुरु स्तुती, श्री दत्त चालीसा यांचे पठणही या दिवशी शुभ मानले जाते.

Comments
Add Comment

Digital 7/12 in Just 15 Rupees : बावनकुळेंचा 'मास्टरस्ट्रोक'! डिजिटल ७/१२ ला कायदेशीर कवच; अवघ्या १५ रुपयांत डाऊनलोड करा अधिकृत उतारा, GR वाचा...

मुंबई : महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका धडाकेबाज

Stock Market Opening Bell: सकाळी शेअर बाजार उसळला पण संध्याकाळपर्यंत....? जाणून घ्या आजची टेक्निकल पोझिशन, सेन्सेक्स ११६ व निफ्टी १८.९५ अंकांने वर

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आज शेअर वाढ झाली आहे. सेन्सेक्स ११६ व निफ्टी १८.९५ अंकांने उसळला आहे. जागतिक घसरणीचा

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या

छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या