महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना येत्या ४ , ५ आणि ६ डिसेबर रोजी सेवासुविधा उपलब्ध करणार आहे. बेस्ट प्रशासनातर्फे मागील वषपिक्षा अतिरिक्त विद्युत व्यवस्था व बससेवा, आरोग्य शिबीर तसेच अल्पोपहार यांचे विशेष नियोजन केले आहे. त्यामुळे अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.


शिवाजी पार्कवर मंडप आणि तंबूंना निवासी दराने तात्पुरता वीज पुरवठा दिला जाणार आहे. यासाठी अर्जदारांना ४ डिसेबरपर्यंत दादर येथील प्रापक सेवा बी/उत्तर विभागीय कार्यालयात अर्ज करता येणार आहे. ४ ते ६ डिसेंबरपर्यंत नाना-नानी पार्कजवळ तात्पुरता वीज पुरवठा देण्यासाठी एक खिडकी योजना उभारण्यात येत आहे वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी राखीव पथकांची नेमणूक छत्रपती शिवाजी पार्क मैदान व वनिता समाज येथे करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर चौपाटी, राजगृह, दादासाहेब फाळके मार्ग, आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि मादाम कामा मार्ग इत्यादी ठिकाणी यावर्षी गतवषपिक्षा वाढ करून १५० व्हॅटचे ७८१ एलईडी मार्गप्रकाश निषे व २००० व्हॅटचे ३ मेटल हलाईड अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसविण्यात येणार आहे. बाजीप्रभू उद्यान, ज्ञानेश्वर उद्यान आणि महापौर बंगला या ठिकाणी ६ किलो व्हॅटचे ३ शोधप्रकाश दिवे विशेष मनोऱ्यांवर बसविण्यात येणार आहे.


मार्गप्रकाश दिल्याचा विद्युत पुरवठा अखंडीत ठेवण्याकरिता प्रत्येकी ६२.१ केव्हीएने जनरेटर शिवाजी पार्क आणि सुर्यवंशी हॉलजवळ येथे ठेवण्यात येणार आहे. एरिअल लिपट व त्यावरील कर्मचारी आणि डीएनएफ सेटस है २४ तास तैनात ठेवण्यात येणार आहे. विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अभियंत्याची राखीव पथके तैनात करण्यात आली आहेत तसेच २५० के. व्ही.ए. चे दोन जनरेटर व त्यासाठी लागणारे कर्मचारी यांचे राखीव पथक तैनात ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.



दुर्धर रोगांबद्दल जनजागृती, तंबाखू व्यसनमुक्तीसाठी उपचार


दरवर्षीप्रमाणे बेस्टकडून मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी आवश्यकता असल्यास किमान ७००० मोफत चष्मे वाटप करण्यात येईल. डासांपासून होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, बिकन पुनिया या साथीच्या, क्षयरोग आणि हृदयरोगाचे माहितीपत्रकाद्वारे जनजागृती, तंबाखूसेवनामुळे होणाऱ्या दुर्धर रोगांबद्दल जनजागृती तसेच तंबाखू व्यसनमुक्तीसाठी उपचार करण्यात येईल. मा व्यतिरिक्त मधुमेहाची तपासणी व त्याच्या नियंत्रणाकरिता समुपदेशन व पत्रिका वितरण, एमडीएसीएसद्वारे एड्स एचआयकीचे प्रतिबंधक उपायाचे पथनाट्य सादर करण्यात येईल. २० जणांचे वैद्यकीय पथक (डॉक्टर, औषध निर्माता, टेक्निशियन व इतर सहकारी) पाच पाळ्यांमध्ये कार्यरत असतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत मोफत पुस्तके तसेच अल्पोपहार देण्यात येईल.

Comments
Add Comment

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून