८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई करत ८७ बेकायदेशीर लोन ॲप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९-अ अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असे ॲप्स ब्लॉक करण्याचा अधिकार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला आहे. या अधिकाराचा वापर करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.


लोकसभेत बेकायदेशीर लोन ॲप्सवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर लेखी उत्तर देताना कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी सांगितले की, ऑनलाइन कर्ज देण्याची सेवा देत असले तरी कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अॅप्सविरुद्ध केंद सरकार सातत्याने पावले उचलत आहे. आतापर्यंत ८७ अशा ॲप्सना ब्लॉक करण्यात आले असून यामागील उद्देश नागरिकांची फसवणूक रोखणे हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


मल्होत्रा यांनी सांगितले की कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये बँक खात्यांची पडताळणी, ऑडिट आणि आवश्यक ती सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येते. ॲप्सच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्या. कर्ज देणाऱ्या काही कंपन्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली. “कंपनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा सुराग मिळताच सरकार कोणतीही ढिलाई न करता तातडीने कारवाई करते,” असेही मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात