मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. . महापालिकेने ए विभागातील ४०० दुबार मतदारांचा शोध मतदार यादीतील छायाचित्रांच्या आधारे घेतला . त्यात केवळ १८ दुबार मतदार आढळून आले असून यापैकी १६ दुबार मतदार हे ए विभागातील होते तर इतर दोन अन्य विभागातील होते. उर्वरीत सर्व केवळ नावाशी साधर्म्य होते, त्यांचे नाव समान होते, परंतु छायाचित्र वेगळी होती. त्यामुळे अशाचप्रकारे आता मतदार यादीतील छायाचित्रांच्या आधारे दुबार मतदारांचा शोध १० डिसेंबरपर्यंत केला जाणार असून त्यानंतर जे खऱ्या अर्थाने दुबार असतील त्यांच्या घरी बिएलओ जावून त्यांच्याकडून परिशिष्ट एक भरुन घेतील,असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.


मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून बुधवार ३ डिसेंबर ही हरकत व सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख होती. याबाबत स्पष्ट करताना अश्विनी जोशी यांनी मतदार यादी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम तयार करण्यात येणार असून मतदान केंद्र निहाय मतदार यादी ही २२ डिसेंबरपर्यंत प्रसिध्द केली जाणार असल्याचे स्पष्ट केले . प्रारुप मतदार यादीसंदर्भात नागरिकांसह राजकीय पक्षांकडून येणाऱ्या हरकती सूचनांचे निवारण करताना एका प्रभागातून अथवा एक मतदार यादीतून दुसऱ्या प्रभागात किंवा अन्य मतदार यादीत नावे गेल्यास किंवा वगळली गेल्यास त्यांची दुरुस्ती तातडीने स्थळपाहणी करून केली जावी असे निर्देश सर्व सहायक आयुक्त तसेच उपायुक्त यांना दिल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले. मतदार यादीसंदर्भात अशाप्रकारच्या दुरुस्तीलाच प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. हे काम प्राधान्याने करतानाच दुबार मतदारांचा शोध घेण्याच्या कामालाही आता प्रशासकीय विभाग स्तरावर सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या छायाचित्रासह असलेल्या मतदार यादीच्या आधारे दुबार मतदारांचा शोध प्रत्येक वॉर्डामध्ये केंद्र तयार करून केले जाणार आहे. यासाठी आवश्यक तज्ज्ञ मंडळी आणि संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे . या मतदार यादीतील छायाचित्रांच्या आधारे दुबार मतदारांचा शोध आधी विभागीय स्तरावर संगणकीयकृत प्रणालीच्या आधारे घेतला जाणार आहे.. यासाठी एन विभागाने एक मॉडेल तयार केले आहे. त्यानुसार ए विभागातील ४०० दुबार मतदारांचा अशाप्रकारे शोध घेण्याचा प्रयत्न केला . त्यातील १८ दुबार वगळता उर्वरीत सर्वांची नावे समान असली तरी छायाचित्र वेगळी असल्याचे आढळून आले. त्यामुळे याच पध्दतीचा अवलंब इतर विभागीय कार्यालयांमध्ये करून येत्या १० डिसेंबरनंतर जे छायाचित्र आणि नाव समान असलेल्या मतदारांच्या घरी जावून त्यांना कल्पना दिली जााणार आहे आणि ते कुठे मतदान करू इच्छितात याबाबत परिशिष्ट एक लिहून घेतले जाणार असल्याचे डॉ जोशी यांनी स्पष्ट केले .


विधानसभेप्रमाणेच मतदार केंद्र, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणार केंद्र


आगामी निवडणुकीकरता मतदान केंद्र निहाय मतदार यादीत तयार करतानाच मतदान केंद्राच्या जागा निश्चित केल्या जाणार आहे. त्यामुळे येत्या १० डिसेंबर २०२५ पर्यंत या जागा निश्चित करण्यासंदर्भातील सूचना सहायक आयुक्त तसेच उपायुक्त यांना देण्यात आल्या आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये जिथे जिथे मतदान केंद्र होती तसेच जेवढी मतदान केंद्र होती, तेवढी मतदान केंद्र महापालिकेच्या निवडणुकीतही असतील. यामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमधील केंद्रही कायम राहतील असेही डॉ जाेशी यांनी स्पष्ट केले.


मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी .....


प्रारुप मतदान यादीतील हरकती आणि सूचनांमध्ये यादीतून नावे वगळली जाणे, एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे समाविष्ठ होणे, दुसऱ्या यादीत नावे जाणे तसेच मृत व्यक्तींची नावे असणे अशाप्रकारच्या हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत असण्याबाबतच्या हरकती व सूचना नोंदवल्याने त्यांना सुनावणीकरता बोलण्यात येणार असून मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यास त्याचा विचार केला जावू शकतो. अन्यथा त्यावरील सूचना केवळ त्याठिकाणी नोंद करून ठेवली जावू शकते. परंतु १ जुलै २०२५मध्ये ज्यांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले .

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत