Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) हिला अखेर अटक केली आहे. अवघ्या काही वेळापूर्वीच तिला अटक करण्यात आली असून, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीची सलग दोन दिवस काही तास चौकशी केली होती. या चौकशीअंती आज (दि. ०२ डिसेंबर) तिला अटक करण्यात आली. शीतल तेजवानी हिने महार वतनाची जागा पॉवर ऑफ ॲटर्नी (POA) करून घेतलेल्या कागदपत्रांच्या आणि अमेडिया कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. या जमीन प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या अडचणी वाढल्या होत्या, कारण पार्थ पवार हे संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर बोपोडी आणि मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिसांत एकच गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करत आहे.


मुंढवा येथील ही जमीन महार वतनाची आहे. मात्र, २००६ मध्ये शीतल तेजवाणी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून घेतली. त्यानंतर २०२५ मध्ये ही जमीन शीतल तेजवाणी हिने अमेडिया कंपनीसोबत करार करून त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता. दरम्यान, बोपोडी जमीनप्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणी यांचा संबंध नसल्याचे पोलिसांनी नंतर स्पष्ट केले होते. शीतल तेजवानीच्या अटकेमुळे आता या जमीन घोटाळा प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळणार आहे.



चौकशीनंतर शीतल तेजवानीला बेड्या


पोलिसांनी या जमीन व्यवहारातील बारीकसारीक तपशील तपासत ही महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. या जमीनप्रकरणात नेमका व्यवहार कशा पद्धतीने झाला, या अनुषंगाने पुणे पोलीस तपास करत आहेत. तपासासाठी सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावले होते. हेमंत गवंडे यांची चौकशी पूर्ण झाली होती, तर बुधवारपासून शीतल तेजवानी हिची याप्रकरणात पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. पोलिसांनी शीतल तेजवानीकडे सलग दोन दिवस चौकशी केली. या चौकशीत पोलिसांनी मुख्यत्वे खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले, संबंधित व्यक्तींकडून पॉवर ऑफ ॲटर्नी (POA) करून घेताना त्यांना काय मोबदला देण्यात आला? कशाच्या आधारावर ही पॉवर ऑफ ॲटर्नी करण्यात आली? अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण झाला? या संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. कागदपत्रे आणि चौकशीदरम्यान शीतल तेजवानीचा या घोटाळ्यात सहभाग स्पष्ट दिसल्यानंतर, तिला आज (दि. ०२ डिसेंबर) अखेर अटक करण्यात आली. या अटकेमुळे आता जमीन घोटाळ्यातील इतर आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या