मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे बदलल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव बदलले आहे. यापुढे मलबार हिल येथील ऐतिहासिक ‘राजभवन’ हे ‘लोकभवन’ या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, ती तत्काळ प्रभावाने लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
७०० इमारतींच्या खालून भुयार खणणार मुंबई : भुयारी मेट्रोमुळे सोपा झालेला मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra ...
“महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव यापुढे ‘राजभवन’ ऐवजी ‘लोकभवन’ असे असेल”, असे अधिसूचनेत म्हटले आहे. हा बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ‘राजभवन’ हे नाव ब्रिटिश राजवटीपासून चालत आलेले असून, स्वातंत्र्यानंतरही देशातील बहुतांश राज्यांमध्ये राज्यपालांचे निवासस्थान ‘राजभवन’ या नावानेच ओळखले जाते. मात्र आता ‘राज’ हा शब्द हटवून ‘लोक’ हा शब्द वापरण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना राज्याचे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “राजेशाही खुणा पुसून टाकण्याचा आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने जनभावनेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘लोकभवन’ हे नाव सर्वसमावेशक आहे”, असे त्यांना सांगितले. पुढील काही दिवसांत सर्व अधिकृत पत्रव्यवहार, नामफलक आणि आणि संकेतस्थळावरही हा बदल केला जाणार आहे.