विप्रोने हर्मन समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोलूशन्स कंपनीचे अधिग्रहण केले

मोहित सोमण: विप्रो लिमिटेड (Wipro Limited) कंपनीने आज मोठी घोषणा केली आहे. कंंपनीने हर्मन समुहाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोलूशन्स (Digital Transformation Solutions) युनिटचे अधिग्रहण (Acquisition) जाहीर केले आहे. कंपनीने यासाठी ऑगस्ट महिन्यात हालचाली सुरू केल्या असून अखेर यशस्वीपणे कंपनीने हे अधिग्रहण केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही कंपनी विप्रो समुहाच्या अंतर्गत काम करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या अधिग्रहणासाठी अद्याप नियामकांची (Regulatory) अंतिम मोहोर लागली नसल्याचे स्पष्ट केले. याविषयी अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. आता नवी कंपनी विप्रो Engineering Global Business Line या नावाखाली कार्यरत असणार आहे. कंपनीने हे अधिग्रहण आपल्या डिजिटल ए आय इंटिग्रेशन तंत्रज्ञानातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी केले असल्याचे समजते आहे. कंपनीने हे अधिग्रहण आपली रिसर्च क्षमता वाढवून नावीन्य, शोध, रिसर्च डेव्हलपमेंट योजनेंतर्गत आपली ताकद वाढवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.


कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, डीटीएस विप्रोमध्ये सखोल उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल परिवर्तन सेवा क्षमता आणते, ज्यामध्ये एम्बेडेड एआय, एम्बेडेड सॉफ्टवेअर, डिव्हाइस अभियांत्रिकी आणि ग्राहक अनुभव प्लॅटफॉर्ममधील मजबूत कौशल्य समाविष्ट आहे. हे अधिग्रहण डीटीएसच्या क्षमतांना विप्रोच्या कन्सल्टिंग नेतृत्वाखालील, एआय संचालित कौशल्याशी जोडेल तर हर्मनच्या एआय सोल्यूशन्सला विप्रो इंटेलिजेंस आमच्या एआय-संचालित प्लॅटफॉर्म, सोल्यूशन्स आणि परिवर्तनात्मक ऑफरिंग्जसह अखंडपणे एकत्रित करेल.यामुळे विप्रोला खऱ्या अर्थाने वेगळे आणि जोडलेले पुढील पिढीचे अनुभव देण्यास सक्षम करेलआणि अभियांत्रिकी सेवांमध्ये जागतिक आघाडीवर म्हणून त्याचे स्थान मजबूत करेल.' असे म्हटले आहे.


या अधिग्रहणाविषयी बोलताना,' आम्हाला विप्रोमध्ये डीटीएस टीम आणि त्यांच्या क्लायंटचे स्वागत करताना आनंद होत आहे. डीटीएसचे अधिग्रहण विप्रोची एआय-संचालित, एंड-टू-एंड अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्याची क्षमता बळकट करते'असे विप्रो लिमिटेडचे व्यवस्थापकीय भागीदार आणि जागतिक अभियांत्रिकी प्रमुख श्रीकुमार राव म्हणाले आहेत. आमच्या क्षमतांमध्ये डीटीएसची सखोल उत्पादन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कौशल्य आणि त्यांच्या पूरक उद्योग समाधान आणि बाजारपेठेतील उपस्थितीसह आम्ही वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे अभियांत्रिकी डीएनए विकसित करत आहोत. हे अधिग्रहण मोठ्या प्रमाणात नवोन्मेष (Innovation) करण्याची, मोजता येण्याजोग्या व्यवसाय मूल्याची आणि सर्व क्षेत्रांमध्ये जटिल परिवर्तनांना समर्थन देण्याची आमची क्षमता वाढवते असेही ते पुढे म्हणाले आहेत.


विप्रो ही आयटी कंपनी असून एआय आधारित तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनी ६५ देशांमध्ये २३०००० हून अधिक कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांसह कंपनी बाजारात कार्यरत आहे. दुपारी ११.३९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२३% घसरणीसह शेअर २४९.७० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.८३% वाढ झाली असली तरी इयर टू डेट (YTD) १६.८५% शेअर घसरला आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये संचार सारथी ॲप सरकारकडून बंधनकारक दूरसंचार विभागाकडून मोठे विधान

नवी दिल्ली: सरकारने भारतात आगामी उत्पादन घेणाऱ्या मोबाईल उत्पादक कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये संचार सारथी ॲप

HMSI Sales: हिरो मोटरसायकलची 'अटकेपार' कामगिरी गाड्यांच्या विक्रीत २५% वाढ नोंदवली

मोहित सोमण:  हिरो मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) कंंपनीने आज आपली नोव्हेंबर महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

Satara Accident : काळाचा घाला! कराडजवळ नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली; ५ जणांची प्रकृती गंभीर, २० जखमी!

सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळच्या कराड परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

Stock Market Update: सकाळी शेअर बाजारात उतरती कळा कायम मिडकॅप शेअर्समध्ये मात्र वाढ सेन्सेक्स १२५ व निफ्टी ३० अंकांनी घसरला

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. अस्थिरतेचे वारे आणखी वाढल्याने