शेअर बाजारात अस्थिरता व नफा बुकिंग सुरू असले तरी लघु व मध्यमकालीन चांगल्या परताव्यासाठी ब्रोकरेजने काही शेअर गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत. चांगल्या फंडामेंटलमुळे कंपनीचे प्रदर्शन आणखी सकारात्मक होत असून कंपनीच्या ऑर्डर फ्लोमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळात तज्ञांच्या मते हे शेअर चांगला परतावा देऊ शकतील. ब्रोकरेजने कंपनीने बजाज हाउसिंग फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, भारत डायनामिक्स, रेमंड रिअल्टी, आफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या शेअर्सला बाय कॉल दिला असून या शेअर्समध्ये आगामी दिवसात वाढ तज्ञांच्या मते वाढ अपेक्षित आहे.