भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती कारवाई करत आहोत, असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले. त्रिपाठींच्या या वक्तव्याने पाकिस्तानला धडकीच भरली असल्याचे वृत्त आहे.


मे महिन्यात पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे हल्ला केला. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर केले. भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रांतसह कॅरिअर बॅटल ग्रुप आक्रमक स्थितीत सज्ज ठेवला. हे बघून पाकिस्तान घाबरला, त्यांची स्वतःच्या युद्धनौका बाहेर काढण्याची हिंमतच झाली नाही. पाकिस्तानच्या युद्धनौका बंदरातच नांगर टाकून उभ्या राहिल्या. मागील सात महिन्यांपासून भारतीय नौदलाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान सतत दबावात आहे; असे भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.


'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी सुरक्षा आणि नौदलाच्या क्षमतेचा खास उल्लेख केला होता. याबद्दल ॲडमिरल त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी वर्षभरातील नौदलाच्या कामगिरीची माहिती आकडेवारीच्या स्वरुपात जाहीर केली.


५०,००० तास उड्डाण (फ्लाइंग) केले.


५२ समुद्री चाच्यांना (Pirates) पकडले.


समुद्रात ५२० लोकांचे जीव वाचवले.


समुद्रामध्ये ११,००० जहाज-दिवस (ship-days) घालवले.


४३,३०० कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले.


समुद्री चाचेगिरी विरोधी मिशनवर (Anti-Piracy Mission) ४० जहाजे पाठवली.


वेगवेगळ्या मिशनवर १३८ जहाजे तैनात केली.


१३८ युद्धनौकांनी (warships) ७,८०० व्यापारी जहाजांना (merchant vessels) सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास मदत केली.


२००८ पासून आजपर्यंत एडनच्या आखातात (Gulf of Aden) एक जहाज नेहमीच तैनात असते.


लाल समुद्रात (Red Sea) हौथी (Houthi) हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ४० मोठी युद्धनौके तैनात केली, ज्यामुळे ५.६ अब्ज डॉलर (Billion) किमतीचा माल सुरक्षितपणे पार पडला.


ऑपरेशन सागर बंधू (Operation Sagar Bandhu) अंतर्गत श्रीलंकेला INS विक्रांत आणि INS उदयगिरीने १२ टन, तर INS सुकन्याने १०-१२ टन मदत सामग्री पोहोचवली.


गेल्या वर्षीच्या नौदल दिवसापासून (Navy Day) आतापर्यंत आम्ही १ नवीन पाणबुडी (Submarine) १२ नवीन युद्धनौका (Warships) नौदलात सामील केल्या


INS उदयगिरी भारतीय नौदलाची १०० वी युद्धनौका (Warship)


भारताचे प्रत्येक जहाज आणि देशाचा प्रत्येक नौसैनिक हा प्रत्येक क्षणी तयार असतो. ऑपरेशन सिंदूर असो वा लाल समुद्रातील हुती दहशतवाद्यांना धडा शिकवणं असो, समुद्री चाच्यांना पकडणे किंवा श्रीलंकेत मदत पोहचवणं. भारतीय नौदल आज जगातील सर्वात सतर्क, शक्तीशाली आणि मानवीय दृष्टीकोणातून सर्वात चांगल्या नौदलांपैकी एक आहे. पाकिस्तानची झोप उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की आमचा कॅरिअर बॅटल ग्रुप अजूनही अरबी समुद्रात तैनात आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही; असेही भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात