जगभरात आज, १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला जातो. हा दिवस एड्ससारख्या (AIDS) अतिशय धोकादायक आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचा आहे. एड्सच्या गंभीर धोक्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते, कारण कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. शरीरात दिसून येणाऱ्या अतिशय सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. एड्सची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) अतिशय कमकुवत होते. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात, ज्यामुळे अतिशय सामान्य लक्षणांशी सामना करणेसुद्धा कठीण होऊन जाते. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने या धोकादायक आजाराबद्दल जनजागृती केली जाते. एड्स इन्फेक्शन कशामुळे पसरते? आणि या धोकादायक आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरतील? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे.
नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान चालेल ज्यात एकूण १५ बैठका होणार आहेत. या पंधरा ...
एड्स हा धोकादायक आजार नेमका कसा पसरतो ?
१. असुरक्षित लैंगिक संबंध (Unsafe Sexual Contact): एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोमशिवाय लैंगिक संबंध ठेवल्यामुळे शरीराला विषाणूची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असते.
२. दूषित सुया आणि इंजेक्शन: बऱ्याचदा एचआयव्ही झालेल्या व्यक्तीच्या रक्ताने दूषित झालेल्या सुया, सिरिंज किंवा इतर इंजेक्शनचा पुन्हा वापर केल्यास एड्सची लागण होऊ शकते. टॅटू किंवा रक्त तपासणी करताना या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
३. रक्त संसर्गातून (Blood Transfusion): एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील संसर्गामुळे (इंफेक्शनमुळे) सुद्धा एड्स आजाराची लागण होते. त्यामुळे रक्तपेढीतील रक्ताची तपासणी अत्यावश्यक आहे.
४. आईकडून बाळाला संक्रमण (Mother to Child Transmission): एचआयव्ही संक्रमित आईकडून तिच्या बाळाला गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणादरम्यान किंवा स्तनपानादरम्यान एड्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदरपणात स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी आणि तपासणी करून घ्यावी. या संक्रमणाच्या मार्गांबद्दल माहिती असल्यास, आपण प्रतिबंधात्मक उपाय करून एड्सपासून स्वतःचा आणि समाजाचा बचाव करू शकतो.
एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत?
१. कंडोमचा योग्य वापर : एड्सचा धोका टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कंडोम एचआयव्हीसह अनेक लैंगिक संक्रमित आजारांपासून (Sexually Transmitted Diseases - STD) शरीराचे रक्षण करते.
२. रक्ताची एचआयव्ही चाचणी : कोणत्याही रक्त चाचण्या (Blood Tests) करण्यापूर्वी रक्ताची एचआयव्ही चाचणी होणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे संसर्गाचा धोका टाळता येतो.
३. इंजेक्शनचा पुनर्वापर नको : एका व्यक्तीसाठी केलेल्या इंजेक्शनचा वापर पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी करू नये. यामुळे साथीच्या संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. आरोग्य सुविधांनी या नियमाचे काटेकोर पालन करावे.
४. एचआयव्ही बाधित गर्भवती महिलांसाठी खबरदारी : एचआयव्ही बाधित गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या, औषध किंवा रक्त चाचण्या करू नयेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेणे बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
५. नियमित चाचण्या आणि उपचार : एचआयव्ही संसर्गाने त्रस्त असलेल्या लोकांनी इतरांचा संसर्ग टाळण्यासाठी आणि स्वतःचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित योग्य त्या चाचण्या आणि प्रतिबंधात्मक उपचार करणे आवश्यक आहे. या उपायांचे पालन केल्यास एचआयव्ही संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.





