प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने काल (३० नोव्हेंबर) मोठा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तारखेनुसार २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूका पार पडणार होत्या. मात्र राज्यातील काही ठिकाणी २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणूका आता २० डिसेंबरला पार पडणार आहेत. यामध्ये अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे.


यानिर्णयाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबरला होणार की २० डिसेंबरला याबाबत अंबरनाथ निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडेही स्पष्ट उत्तर नसल्याने अंबरनाथचे मतदार आणि निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार संभ्रमावस्थेत आहेत. कारण अंबरनाथ नगरपरिषदेकरता होणारे मतदान नेमकं कधी आहे? यावर अधिकृत उत्तर नसल्याचे निवडणूक अधिकारी उमाकांत गायकवाड आणि अमित पुरी यांनी पत्रकार परीषद घेत सांगितले.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता मतदान २ डिसेंबर आणि २० डिसेंबर या दोन्ही दिवशी होणार असून ज्या ११ वॉर्डातील उमेदवारांनी अपील केले होते, फक्त त्याच ११ वॉर्डातील निवडणुकांकरिता २० डिसेंबरला मतदान होईल. अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकांवर उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेले चिन्ह या सर्व गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेच्या काही प्रभागांमधील निवडणूक पुढे ढकण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मीरा-भाईंदर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल

पदाधिकारी निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच विश्वास भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या

बदलापूरमध्ये फुलले 'कमळ'

नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे, नगरसेवक संख्येत बरोबरी बदलापूर  : कुळगाव–बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने

अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच

भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी; शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर पराभूत अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचा निकाल

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप