Nashik Crime News : भिंतीवर 'बिब्बा' आणि 'नागाच्या आकाराचा खिळा'! ७ पानी सुसाईड नोट लिहून संपवलं होतं नेहाने जीवन, नेहाच्या घरात बरंच काही मिळालं...

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावाडीत राहणाऱ्या नेहा संतोष पवार या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून नेहाने २७ नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले होते. आत्महत्या करण्यापूर्वी नेहाने आपल्या भावाला व्हॉट्स ॲपद्वारे ७ पानांची सुसाईड नोट पाठवून सासरच्या छळाचा तपशील सांगितला होता. या माहितीच्या आधारावर पंचवटी पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी नेहाच्या सासरी घरझडती (Search) घेतली असता, त्यांना एक अत्यंत संशयास्पद वस्तू मिळाली. एका भिंतीवर बिब्बा (हा एक प्रकारचा विषारी पदार्थ) आणि त्याला नागाच्या आकाराचा खिळा ठोकलेला आढळला. या वस्तूंच्या आधारावर, नेहाच्या सासरचे लोक तिला जादूटोणाची भीती दाखवून मानसिक छळ करत होते, असा पोलिसांना संशय आहे. या धक्कादायक माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्ह्यात नरबळी, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कलम (Section) वाढवला आहे. पोलिसांनी आतापर्यंत नेहाचा नवरा, सासू आणि तीन नणंद अशा एकूण पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पंचवटी पोलीस करत आहेत.



नेमकं काय प्रकरण ?


नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या नेहा संतोष पवार (Neha Santosh Pawar) प्रकरणात तिच्या ७ पानांच्या सुसाईड नोटमधून अत्यंत धक्कादायक आणि क्रूर माहिती समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी नेहाचा केलेला मानसिक छळ (Mental Harassment) हा अमानुष स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेहाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, लग्नानंतर नवऱ्याने शारीरिक संबंधानंतर 'सील ब्लड' (Seal Blood) निघाले नाही म्हणून तब्बल १५ ते २० दिवस तिच्यावर संशय घेतला. नंतर सील ब्लड निघाले तेव्हा तो शांत झाला. याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे, मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) वेळीही तिला अमानुष छळ सहन करावा लागला. नेहाच्या म्हणण्यानुसार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी तिला मासिक पाळी आली होती. पण तिच्या सासूला शंका आली की ती खोटे बोलत आहे. यावर उपाय म्हणून सासूने थेट आपल्या नंदेला सांगितले की, "तिला पॅड लावून तपासणी करून बघ." यानंतर नंदेने खरंच पॅड लावून तपासणी केली. इतकेच नव्हे, तर तिच्या नवऱ्याने देखील पाळी आली की नाही, याची तपासणी केली असल्याचे नेहा पवारने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास करत असतानाच पंचवटी पोलिसांना घरात बिब्बा आणि नागाच्या आकाराचा खिळा आढळला आहे, ज्यामुळे जादूटोण्याच्या भीतीनेही छळ केल्याचा संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.



सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय ?


नेहाने लिहिले आहे की, तिचे लग्न ४ जून २०२५ रोजी झाले. १० मार्च रोजी सुपारी फोडल्याच्या वेळी सासरच्यांनी "हुंडाप्रथा बंद आहे," असे सांगूनही "नवरदेवास त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी आणि पाच भांडी द्या," अशी मागणी केली होती. माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले, पण लग्नानंतर सासरचे लोक भांडण करीत नसले तरी मानसिक त्रास देत होते. सासरच्यांकडून तिला अनेक किरकोळ कारणांवरून त्रास दिला जात होता. "मोबाइलवर सारखी बोलते," "घरकाम येत नाही." "पतीला उलटसुलट सांगते," "सिलिंडर टाकी एक महिन्यातच संपते." सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ते पैशांची मागणी करू लागले, म्हणून नेहाने माहेरहून २० हजार रुपये आणून दिले होते. नियमित मासिक पाळी येत नसल्यानेही तिला त्रास देण्यात आला. सर्वात गंभीर आरोप म्हणजे, पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते आणि पतीने तिला दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते. दिवाळीसाठी १५ दिवस माहेरी पाठवले असताना, केवळ दहाव्या दिवशीच सासू आणि पतीने तिला सासरी परत बोलावले. नेहाने आपल्या भावाला उद्देशून लिहिले आहे की, "भाऊ, सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली, तर ते गायब करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवत आहे." शेवटी तिने लिहिले, "माझे नशीब खराब असून, मला सासर चांगले मिळाले नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे." या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Kotak Mahindra Bank Quarterly Results: देशातील बड्या खाजगी बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या कर्जात १६% वाढ

मोहित सोमण: देशातील बड्या खाजगी बँकेपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

HDFC Quarterly Results Update: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा मजबूत निकाल जाहीर तरीही शेअर १.७२% कोसळत बंद

मोहित सोमण: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणून ओळखली जाणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे.

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई

बँक ऑफ अमेरिकेकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे 'कौतुक' भारताचे जीडीपी भाकीत ७% वरून ७.६% पातळीवर बदलले

प्रतिनिधी: बँक ऑफ अमेरिका (Bank of America BoFA) या बँकेकडून भारतीय अर्थव्यवस्थेची प्रशंसा करण्यात आली आहे. सरकारने

शेअर बाजारात मोठे 'सेल ऑफ' या कारणामुळे गुंतवणूकदारांची पंचाईत सेन्सेक्स ३२२.३९ व निफ्टी ७८.२५ अंकांने कोसळला जाणून घ्या उद्याची स्ट्रेटेजी!

मोहित सोमण: अखेर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अपेक्षित घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३२२.३९ अंकाने घसरला असून

महानगरपालिका निवडणूक; आरटीओ मुंबई (मध्य) कार्यालय १४ आणि १५ जानेवारीला बंद

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई