एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सुरुवात! केएलने केले रोहीत आणि विराटच्या जोडीचे कौतुक

मुंबई: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वनडे सामना जिंकला. पण हा सामना संपल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीबाबत एक मोठं वक्तव्य राहुलने केले आहे. ज्याबद्दल चर्चांना जोर आला आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही भारताचे नेतृत्व केले असताना गौतम गंभीरने त्यांना कसोटी क्रिकेटपासून लांब ठेवले आहे. त्यामुळे आता फक्त वनडे क्रिकेट खेळणे हे त्यांच्या हातात आहे. तरीसुद्धा विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सातत्याने दमदार कामगिरी करत आहेत. गेल्या सामन्यात रोहित आणि विराट यांनीच भारताला सहजपणे विजय मिळवून दिला होता. आजच्या वनडे सामन्यात जर विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नसते तर भारताचे काय झाले असते, याचा विचारही न केलेला बरा असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामना संपल्यावर भारताचा हंगामी कर्णधार केएल राहुलने या दोघांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


केएल राहुल सामना संपल्यावर म्हणाला की, "रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहणे ही एक मेजवानी असते. मी यापूर्वी काही वेळा त्यांना एकत्र खेळताना पाहिले आहे. पण आजही त्यांना जेव्हा एकत्र फलंदाजी करताना पाहतो, तेव्हा नजर त्यांच्यावरून हटत नाहीत. दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे कधी नेमकं काय करायचं, हे त्यांना चांगलंच माहिती आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जेव्हा खेळत असतात तेव्हा समोरचे प्रतिस्पर्धी किती मुर्ख वाटतात. कारण रोहित आणि कोहली दाखवून देतात की, ते नेमके कोण आहेत, त्यांनी केवढं मोठं स्थान मिळवलं आहे. ड्रेसिंग रुममध्येही जेव्हा ते एकत्र असतात तेव्हा त्यांचं वागण आनंद देणारं असतं."



केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवला. यामुळे मालिकेत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विराट आणि रोहीतसह हर्षित राणानेही चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीला त्याने चांगल्या विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवनेही नेहमीप्रमाणे च त्याचे काम चोख बजावले आहे. त्यामुळे त्याची गोलंदाजीही मोलाची ठरली.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत