नॅशनल हेराल्ड खटल्यात सोनिया आिण राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल

गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप,


नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड खटल्यात नवीन गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नव्याने गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये राहुल व सोनिया गांधी यांच्यासह इतर सहा जण आणि तीन कंपन्यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत.


पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, काँग्रेस पक्षाशी संलग्न असलेल्या एजेएल (असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड) कंपनीवर फसवणूक करून कंपनी बळकावण्यासाठी गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून ३ ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ईडीने आपला तपास अहवाल दिल्ली पोलिसांबरोबर शेअर केला होता. पीएमएलएच्या कलम ६६(२) अंतर्गत, ईडी कोणत्याही एजन्सीला अशा प्रकरणांमध्ये तपास अहवाल व पुराव्यांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यास सांगू शकते.'


सहा जणांविरोधात गुन्हा दाखल




  1. एफआयआरमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा (इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख) आणि इतर तीन जणांची नावं आहेत. तसेच एजेएल, यंग इंडियन, डॉटेक्स मर्चंडायज प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांची देखील नावे आहेत.

  2. डॉटेक्स ही कोलकातामधील कथित शेल कंपनी असल्याचे ईडीने म्हटले आहे. या कंपनीने यंग इंडियन कंपनीला एक कोटी रुपये दिले होते. या व्यवहाराद्वारे यंग इंडियन कंपनीने काँग्रेसला ५० लाख रुपये देऊन तब्बल २,००० कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या एजेएल कंपनीवर नियंत्रण मिळवलं. एफआयआरमध्ये नमूद असलेल्या तिन्ही कंपन्या कोलकातास्थित बोगस कंपन्या असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस एजेएलच्या भागधारकांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत.

Comments
Add Comment

एड्सवरील नवीन औषधाची उपलब्धता कायद्यामुळे संकटात

पेटंट व नियामक परवान्यांमुळे २०२६ पर्यंत पुरवठा करण्यात अपयश मुंबई : एचआयव्हीपासून जवळपास १०० टक्के संरक्षण

गुगल मॅप अॅपमध्ये नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध

मुंबई (प्रतिनिधी) : गुगल मॅप अॅपमध्ये आता नवीन पॉवर सेव्हिंग मोड उपलब्ध झाला असून तो सुरुवातीला फक्त पिक्सेल १०

Virat Kohli Century : रांचीत किंग कोहलीचा धमाका! वनडेत ५२ वे शतक झळकावत विराट कोहलीने रचला इतिहास; तेंडुलकरचा ५१ शतकांचा विक्रम मोडला

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील (IND vs SA) रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या

आता 'सक्रिय SIM' बंधनकारक! सक्रिय सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram ला 'ब्रेक'; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्स वापरणाऱ्या लाखो भारतीय वापरकर्त्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत

दिल्ली ब्लास्ट केस: हल्द्वानीतून मौलाना कासमीला अटक! उमरचे कॉल डिटेल्स ठरले निर्णायक; रेड फोर्ट स्फोटाच्या तपासाला मोठे वळण

नवी दिल्ली : दिल्लीतील रेड फोर्टजवळ (Red Fort) झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला आता एक मोठे आणि महत्त्वाचे

Parliament Winter Session 2025 : आज सर्वपक्षीय संसदीय बैठक! संसदेत १० नवीन विधेयके सादर होण्याची शक्यता

नवी दिल्ल्ली : संसदेच्या आगामी सत्रात केंद्र सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी