Rohit sharma....रोहित शर्मा ODI क्रिकेटचा नवा 'सिक्सर किंग'

रांची : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचत ‘सिक्सर किंग’ बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा जुना विक्रम मागे टाकत वनडे इतिहासातील सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज म्हणून नवी नोंद केली.


रोहितच्या नावावर आता एकूण ३५२ षटकारांची नोंद झाली आहे. त्याने २७७ सामन्यांतील २६९ डावांमध्ये ही कामगिरी केली. आफ्रिदीनं ३९८सामन्यांच्या ३६९ डावांमध्ये ३५१ षटकार ठोकले होते. अनेक वर्षांपासून त्याचा हा विक्रम अबाधित होता, मात्र रांचीत रोहितनं तो मोडीत काढला.


वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:


३५२ - रोहित शर्मा, भारत


३५१ - शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान


३३१ - ख्रिस गेल, वेस्ट इंडिज


२७० - सनथ जयसूर्या, श्रीलंका


२२९ - एमएस धोनी, भारत


रोहितनं आणखी एक विशेष नोंद आपल्या नावावर केली आहे. तो एकाच संघासाठी ३५० पेक्षा जास्त षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितनं टीम इंडियासाठी सर्व ३५२ षटकार नोंदवले. दुसरीकडे, आफ्रिदीनं पाकिस्तानसाठी ३४९ तर आयसीसीच्या टीमसाठी २ षटकार मारले होते.


रांचीच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत भारतीय डावाला मजबूत सुरुवात करून दिली. यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यानंतर रोहित आणि विराटनं १०० भागीदारी रचली. विराटनं ४८ चेंडूत षटकार ठोकत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर रोहितनं ४३ चेंडूत अर्धशतक गाठलं, जे त्याच्या वनडे कारकिर्दीतील साठवं अर्धशतक ठरलं. रोहितनं ५१ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्यानंतर मार्को जानसेनच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला.

Comments
Add Comment

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर

India vs South Africa, 5th T20I : अहमदाबादमध्ये तिरंगा फडकला! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय; मालिका ३-१ ने खिशात

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी