लढाऊ विमाने, नौदल जहाजांची घुसखोरी; चीन-तैवान तणाव शिगेला

नवी दिल्ली : सध्या चीन आणि तैवान दरम्यान तणाव चिघळत चालला आहे. चीनकडून तैवानच्या हद्दीत लढाऊ विमानं आणि नौदल जहाजांची वाढती घुसखोरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आशिया खंडात नव्या युद्धाची चाहूल लागल्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.


जागतिक स्तरावर अनेक मोठ्या घटना एकाच वेळी घडत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरूच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर लादलेले टॅरिफमुळे जागतिक व्यापार अस्थिर झाला आहे. त्याचवेळी चीन आणि जपानमध्ये तैवानच्या मुद्द्यावरून वाद अधिक तीव्र बनला आहे. जपानचे पंतप्रधान ताकाईची यांचे तैवानबाबतचे विधान चीनला नाराज करणारे ठरले, आणि या पार्श्वभूमीवर चीनच्या क्षेत्रीय हालचालींनी जगभरात खळबळ उडवली आहे.


नेमकं काय घडतंय?


चीन तैवान आपला भाग असल्याचा दावा करतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र मानतो. या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने गेल्या काही दिवसांत तैवानच्या आजूबाजूला सैन्यविषयक हालचाली वाढवल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत चीनच्या पीएलएची २७ विमाने आणि ११ नौदल जहाजे तैवानच्या परिसरात दिसून आली आहेत.


यापैकी २५ विमानांनी दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व ADIZ म्हणजेच हवाई संरक्षण ओळख क्षेत्रात प्रवेश केला आहे. आपल्या हद्दीत चीनची विमानं आणि जहाजे सतत दिसत असल्याने तैवाननेही संरक्षण व्यवस्था अधिक कडक केली आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे तैवानने स्पष्ट केले आहे.


चीनची सातत्याने घुसखोरी


या आधी चीनच्या १२ विमानांनी चीन-तैवानमधील मध्यरेषेचे उल्लंघन केले होते. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व ADIZ मध्ये J-१६ लढाऊ विमानं, H-६ बॉम्बर आणि KJ-५०० विमानं दिसून आली. या हालचालींमुळे तैवानने आपले सैन्य सतर्क ठेवले आहे.


या वाढत्या तणावामुळे आशिया खंडात नव्या संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. चीनच्या आक्रमक धोरणाला तैवान देणारं प्रत्युत्तर किती तीव्र असेल, आणि परिस्थिती कोणत्या दिशेने वळेल, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने